Prepare time: 10 min
Cook: 20
Ready in: 30 min
Ingredients
- 1कप हरभरे
- 2 कांदे (बारीक चिरलेले)
- 2 टोमॅटो (बारीक चिरलेले किंवा प्युरी)
- 1 चमचा आले-लसूण पेस्ट
- 2 चमचे तेल
- 1चमचा जिरं
- 1 चमचा हळद
- 2 चमचा लाल तिखट
- 1 चमचा गरम मसाला
- 1 चमचा धणे पावडर
- 1 चमचा चणा मसाला
- मीठ चवीनुसार
- 2 चमचे कोथिंबीर (सजावटीसाठी)
- 1 लहान टेबलस्पून लिंबाचा रस
Directions
- रात्रभर पाण्यात ८ तास हरभरे भिजत ठेवा.
- ८ तासांनंतर प्रेशर कुकरमध्ये ३-४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या.
- एका कढईत तेल गरम करून त्यात जिरं घाला.
- जिरं घातल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
- आता आले-लसूण पेस्ट घालून परतून घ्या.
- नंतर यामध्ये हळद, लाल तिखट, धणे पावडर आणि गरम मसाला घालून चांगले मिक्स करा.
- नीट मिक्स केल्यानंतर यामध्ये टोमॅटो प्युरी घालून तोपर्यंत परता जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही.
- यामध्ये उकडलेले चणे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून १० मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
- मीठ घालून ५ मिनिटे आणखी शिजवा
- गॅस बंद करून त्यात लिंबाचा रस आणि कोथिंबीर घाला.
- अशाप्रकारे चणा मसाला तयार आहे.