Prepare time: 10 min
Cook: 20
Ready in: 30 min
Ingredients
- 1 वाटी तांदूळ (बासमती)
- कोळंबी (प्रॉन्स)
- 1 छोटा कांदा (चिरलेला)
- 1 छोटा टोमॅटो (चिरलेला)
- 1/2 वाटी शिमला मिरची (चिरलेली)
- 1/2 वाटी गाजर (चिरलेले)
- 1/2 वाटी मका
- 1 चमचा आले-लसूण पेस्ट
- 2 चमचे सोया सॉस
- 1 चमचा चिली सॉस
- 1/ 2चमचा काळी मिरी पूड
- 1 चमचा व्हिनेगर
- 2 चमचे तेल
- मीठ चवीनुसार
- कोथिंबीर सजावटीसाठी
Directions
- तांदूळ स्वच्छ धुऊन साधारण 8०% शिजवून घ्या आणि बाजूला ठेवा.
- कढईत तेल गरम करून त्यामध्ये आले-लसूण पेस्ट आणि कांदा घालून गुलाबी होईपर्यत चांगलं परतून घ्या.
- त्यामध्ये कोळंबी घालून 2-3 मिनिटे परता जोपर्यंत ते हलके गुलाबी होत नाही.
- आता त्यामध्ये टोमॅटो, शिमला मिरची, गाजर आणि मका घालून 2 मिनिटे परतून घ्या.
- नंतर त्यामध्ये सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगर, काळी मिरी पूड आणि मीठ घालून चांगले मिसळा.
- आता त्यामध्ये शिजवलेला भात घालून सर्व मिश्रण एकजीव करून मिक्स करून घ्या.
- 2 ते 3 मिनिटे गॅसवर ठेवा जेणेकरून चव मिसळेल.
- गॅस बंद करून कोथिंबीरने सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.