Prepare time: 10 min
Cook: 10
Ready in: 30 min
Ingredients
- 1 मध्यमफुलकोबी (कॉलीफ्लॉवर)
- 1कप मैदा
- 1 ते 2 कप कॉर्नफ्लोअर
- 1 चमचा आले-लसूण पेस्ट
- 1 चमचा लाल तिखट
- 1 ते 2 चमचा हळद
- 1 चमचा सोया सॉस
- 1 चमचा मिरीपूड
- 1 चमचा गरम मसाला
- चवीनुसार मीठ
- थोडेसे पाणी (बॅटर तयार करण्यासाठी)
- तळण्यासाठी तेल
Directions
- फुलकोबीचे मध्यम आकाराचे तुकडे करून कोमट पाण्यात 5 मिनिटे ठेवून घ्या.
- एका बाऊलमध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, सोया सॉस
- मिरीपूड, गरम मसाला आणि मीठ घालून मिक्स करा
- त्यात थोडे थोडे पाणी घालून गुळगुळीत आणि मध्यमसर बॅटर तयार करा.
- फुलकोबीचे तुकडे या बॅटरमध्ये मिक्स करून व्यवस्थित कोट करून घ्या.
- कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर कोबीचे तुकडे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
- तळून झाल्यावर एका टिश्यू पेपरमध्ये काढून घ्या.
- गरमागरम क्रिस्पी तयार आहे.