जग बदलण्यासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी माध्यम असल्याचे म्हटले जाते. सर्वोत्तम शिक्षण संस्था असणारे देश विद्यार्थ्यांना आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये तर देतातच पण त्यांची आर्थिक प्रगती करण्यासाठीही प्रोत्साहन देतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी भारतातून परदेशात शिक्षण घेण्यासाठी जातात. परदेशात शिक्षण घेण्यासाठी, विद्यार्थी अशा शिक्षण संस्था निवडण्याला प्राधान्य देतात जिथे शिक्षण व्यवस्था सर्वोत्तम असेल. नुकताच यूएस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्टने अनेक आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणांद्वारे जगातील टॉप 5 देशांची नावे प्रसिद्ध केली आहेत. जिथे शिक्षण व्यवस्था सर्वोत्तम आहे. जाणून घेऊयात जगातील या टॉप 5 शिक्षण संस्था असलेल्या देशांविषयी.
फ्रान्स
जगातील सर्वोत्तम शिक्षण व्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत फ्रान्स पाचव्या क्रमांकावर आहे. फ्रान्समधील शिक्षण राष्ट्रीय अभ्यासक्रमावर आधारित आहे. येथे 3 ते 16 वर्षे वयापर्यंत शिक्षण सक्तीचे आहे. सरकारी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी सरकार स्वतः निधी देते. फ्रान्सच्या उत्कृष्ट शिक्षण व्यवस्थेमुळे, जगभरातून विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात.
कॅनडा
सर्वोत्तम शिक्षण व्यवस्था असलेल्या देशांमध्ये कॅनडा चौथ्या क्रमांकावर आहे. कॅनडामधील सरकारी शाळा आणि विद्यापीठांमध्ये शिक्षण मोफत असले तरी, परदेशी विद्यार्थ्यांना येथे शिक्षण घेण्यासाठी शुल्क भरावे लागते. कॅनडामध्ये, मुले त्यांचे प्राथमिक शिक्षण वयाच्या चौथ्या वर्षी सुरू करतात आणि त्यांना 16 वर्षांचे होईपर्यंत शाळेत जाणे आवश्यक आहे. येथे अनेक उच्च दर्जाची विद्यापीठे देखील आहेत.
जर्मनी
जगातील सर्वोत्तम शिक्षण व्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत जर्मनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. बालवाडीची संकल्पना जर्मनीपासून सुरू झाली. 3 ते 6 वयोगटातील मुले येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. वयाच्या 6 व्या वर्षांनंतर शाळेत जाणे अनिवार्य आहे. जर्मनी हे मोफत शिक्षणाचे केंद्र मानले जाते, कारण येथील सरकारी विद्यापीठांमध्ये सामान्यतः कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
ब्रिटन
ब्रिटनमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम शिक्षण व्यवस्था आहे. येथे मुले वयाच्या चौथ्या वर्षी शाळेत जाऊ लागतात. ब्रिटनमधील शालेय शिक्षण केवळ उत्कृष्ट नाही तर येथे उच्च शिक्षणाची चांगली व्यवस्था देखील आहे. ऑक्सफर्ड आणि केंब्रिज सारखी जगातील अनेक टॉप विद्यापीठे यूकेमध्ये आहेत. ब्रिटनमध्ये 4 लाखांहून अधिक परदेशी विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत.
अमेरिका
अमेरिकेची शिक्षण व्यवस्था जगातील सर्वोत्तम मानली जाते. विद्यार्थ्यांसाठी सर्वात लोकप्रिय शिक्षण संस्था या न्यू यॉर्क, कॅलिफोर्निया आणि टेक्सासमध्ये आहेत. देशाच्या सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात राज्य आणि स्थानिक करांद्वारे निधी दिला जातो, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना वयाच्या 5 व्या वर्षी सक्तीचे शिक्षण सुरू करावे लागते आणि नियमांनुसार किमान 16 वर्षांपर्यंत ते चालू ठेवावे लागते.
हेही वाचा : Mental Health Tips : रोज एक संत्री खा, डिप्रेशनला दूर ठेवा
Edited By – Tanvi Gundaye