Prepare time: 10 min
Cook: 10
Ready in: 30 min
Ingredients
- 200 ग्रॅम मशरुम
- 150 ग्रॅम बेसन
- 50 ग्रॅम तांदळाचे पिठ
- 2 चमचे लाल तिखट
- 2 चमचे हळद
- मीठ चवीप्रमाणे
- 1 चमचा ओवा
- सोडा
Directions
- सर्वात आधी मशरूम स्वच्छ धुवून घ्या.
- मशरूम स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये बेसन आणि तांदळाच्या पिठामध्ये लाल तिखट हळद ओवा आणि सोडा घालून मिश्रण एकजीव करून घ्या
- मिश्रण चांगलं एकजीव झाल्यानंतर एका बाजूला कढई तापत ठेवा.
- तेल घालून यामध्ये मशरूम चांगले तळून घ्या.
- मशरूमचा रंग लालसर होईल पर्यत मंद आचेवर तळून घ्या.
- मशरूम पकोडा तयार आहे याचा आस्वाद तुम्ही चटणी किंवा सॉससह घेऊ शकता.