Prepare time: 10 min
Cook: 10
Ready in: 30 min
Ingredients
- 2 चमचे बटर
- 1 वाटी किसलेला चीज
- 2 कांदे बारीक चिरलेले
- 2 टोमॅटो बारीक चिरलेले
- 2 चमचा आलं-लसूण पेस्ट
- 1 ते 2 चमचे मिरी पूड
- चवीनुसार मीठ
- 4 ब्रेडच्या स्लाइस
- 1 चमचा टॉमॅटो सॉस
Directions
- तव्यावर बटर गरम करून त्यात आलं-लसूण पेस्ट परतून घ्या.
- त्यात चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून हलकं परतून घ्या.
- चिरलेला पालक घालून २-३ मिनिटं शिजवा.
- त्यामध्ये मीठ, मिरीपूड आणि चीज घालून मिक्स करा.
- ब्रेडच्या एका स्लाइसवर टॉमॅटो सॉस लावा आणि त्यावर पालकाचं मिश्रण पसरवा.
- वरून दुसरी ब्रेडची स्लाइस ठेवा आणि सँडविच ग्रिलर किंवा तव्यावर बटर लावून दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
- गरमागरम सँडविच चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.
- हे सँडविच हेल्दी आणि टेस्टी आहे, नाश्त्यासाठी उत्तम पर्याय