Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीRecipePancakes Recipe : पॅनकेक

Pancakes Recipe : पॅनकेक

Subscribe

हल्ली बऱ्याच लोकांना पॅनकेक खायला खूप आवडते हे पॅनकेक आपण बऱ्याचदा बाहेरून ऑर्डर करतो. तुम्ही हे पॅनकेक घरी देखील बनवू शकता. आज आपण जाणून घेऊयात पॅनकेक कसे बनवायचे.

Prepare time: 10 min
Cook: 10
Ready in: 20 min

Ingredients

  • 1 कप मैदा
  • 1 चमचा साखर
  • 2 चमचे मीठ
  • 2 चमचे बेकिंग पावडर
  • 1 वाटी दूध
  • 3 चमचे तेल
  • 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स

Directions

  1. सर्व प्रथम एका मोठ्या भांड्यात मैदा, साखर , मीठ,बेकिंग पावडर, दूध, तेल आणि व्हॅनिला इसेन्स घालून एक घट्ट पेस्ट तयार करून घ्या.
  2. पॅनमध्ये तेल घालून , तवा गरम करून घ्या.
  3. तेल गरम झाल्यावर गॅस मंद आचेवर करून तयार केले मिश्रण घाला.
  4. सोनेरी रंग येईपर्यंत 2-3 मिनिटं शिजवा.
  5. नंतर उलटून दुसऱ्या बाजूनेही 1-2 मिनिटं शिजवा.
  6. अशाप्रकारे पॅनकेक तयार आहे.
  7. हे तुम्ही गरमागरम पॅनकेक बटर, चॉकलेट सॉस किंवा फळांसोबत सर्व्ह करू शकता.

Manini