Prepare time: 10 min
Cook: 15 min
Ready in: 30 min
Ingredients
- 3 मोठे बटाटे
- 2 चमचे कॉर्नफ्लोअर
- 1 टेबलस्पून तांदळाचे पीठ
- 1 ते 2 चमचे लाल तिखट
- 1 ते 2 चमचे गरम मसाला
- 1 ते 2 चमचे हळद
- 1 ते 2 चमचे मिरीपूड
- 1 चमचा आलं-लसूण पेस्ट
- मीठ चवीनुसार
- कोथिंबीर (सजावटीसाठी)
- 1चमचा लिंबाचा रस
- तेल तळण्यासाठी
Directions
- बटाटे नीट सोलून घ्या.
- त्याचे पातळ काप करून थोड्या वेळ पाण्यात ठेवा.
- नंतर त्यातील पाणी काढून घ्या.
- बटाट्याचे तुकडे चांगल्या कपड्याने पुसून घ्या.
- एका मोठ्या भांड्यात बटाट्याचे तुकडे घाला.
- त्यामध्ये कॉर्नफ्लोअर, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, मिरीपूड, गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट, मीठ आणि लिंबाचा रस घालून नीट मिक्स करून घ्या.
- सर्व मसाले व्यवस्थित लागण्यासाठी बटाट्यांना चांगले मॅरीनेट करून 15 ते 20 मिनिटे ठेवा.
- कढईत तेल गरम करा आणि त्यात बटाट्याचे तुकडे एक-एक करून टाका. मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळा.
- तळून झाल्यावर टिश्यू पेपरवर काढून जास्तीचे तेल काढून घ्या.
- आता वरून कोथिंबीर घालून तुम्ही पोटॅटो क्रिस्पी सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत याचा आस्वाद घेऊ शकता.