Friday, January 3, 2025
HomeमानिनीReligiousSurya Mantra : या सूर्यमंत्रानी करावी दिवसाची सुरुवात, होईल भाग्योदय

Surya Mantra : या सूर्यमंत्रानी करावी दिवसाची सुरुवात, होईल भाग्योदय

Subscribe

हिंदू धर्मात मंत्रोच्चार करण्याला अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे. देवपूजा करताना देवदेवतांचे मंत्रजप करण्यात येतात. काहींना सकाळी पूजेसोबत सूर्यदेवाला अर्ध्य देण्याची सवय असते. शास्त्रात, दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करणे शुभ मानले आहे. सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने भाग्योदय होतो, असे म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला सूर्याची पूजा करताना कोणत्या सूर्यमंत्राचा जप करावा, याबद्दल सांगणार आहोत.

सूर्याला जल कसे अर्पण कराल –

  • सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करावे.
  • जल अर्पण करताना तांब्याचे भांडे वापरावे.
  • आपले तोंड पूर्वेकडे ठेवून, जल अर्पण करावे.

सूर्यदेवाचे प्रभावी मंत्र –

ऊँ सूर्याय नम:

- Advertisement -

शास्त्रानुसार, ऊँ सूर्याय नम: या सूर्यदेवाच्या बीज मंत्राची निर्मिती महादेवांनी केली आहे. असे म्हणतात की, सूर्यदेवाची पूजा करताना हा मंत्रोच्चार केल्याने अनेक फायदे होतात. सूर्य देवाची कृपादृष्टी हवी असल्यास ओम सूर्याय नम: मंत्राचा जप करावा.

कधी कराल?

- Advertisement -
  • सकाळी लवकर उठल्यावर आंघोळ झाली की, ओम सूर्याय नम: या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते.
  • तुम्ही दररोज सुर्याला अर्ध्य देत असाल तर तेव्हाही या मंत्राचा जप करू शकता.

फायदे –

  • ओम सूर्याय नम: मंत्राचा जप केल्याने भागोदय होतो, असे म्हटले जाते.
  • ओम सूर्याय नम: या मंत्राच्या जपाने प्रगतीतील अडथळे दूर होण्यास मदत मिळते.
  • यश आणि सौभाग्य प्राप्तीसाठी सूर्यदेवाच्या या मंत्राचा जप अवश्य करावा.
  • जल अर्पण करताना मंत्र जप केल्याने उर्जा वाढते.
  • असे म्हणतात की, सूर्याच्या कृपेमुळे मान-सन्मान वाढतो.

या व्यतिरीक्त तुम्ही पुढील मंत्राचा जप करू शकता.

  • ओम हरी घृणी: सूर्य आदित्य: स्वच्छ ओम
  • ओम हीं सूर्याय नम:
  • ओम घृणी सूर्याय नम:
  • ओम भास्कराय नम:
  • ओम अर्काय नम:
  • ओम सावित्रे नम:

 

 

 

 

हेही पाहा –


 

- Advertisment -

Manini