Prepare time: 10 min
Cook: 20
Ready in: 30 min
Ingredients
- 1 कप तांदूळ
- 1 चमचा खाण्याचा रंग
- 1 कप साखर
- 2 चमचे तूप
- 5 कप पाणी
- 1 गरजेनुसार तमालपत्र
- काजू आणि बदाम 3 ते 4
- दालचिनी [आवडीप्रमाणे ]
- लवंग [आवडीप्रमाणे ]
- केशर [आवडीप्रमाणे ]
Directions
- सर्वात प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून 1 तास भिजत ठेवा.
- आता कुकरमध्ये साजूक तूप घालून त्यामध्ये काजू आणि बदाम सोनेरी रंगाचे होईपर्यंत फ्राय करा.
- ड्राय फ्रुट चांगले तळल्यानंतर बाजूला ठेवा.
- आता त्याच साजूक तुपामध्ये चिरलेले सुक्या खोबऱ्याचे तुकडे परतून घ्या आणि बाजूला ठेवा.
- आता त्याच कुकरमध्ये आणखी थोडं तूप घालून तमालपत्र, दालचिनी आणि लवंग चांगलं परतून घ्या.
- कुकरमध्ये भिजवलेले तांदुळ घालून त्यामध्ये अडीच कप पाणी घाला. तांदुळ जास्त ढवळू नका नाहीतर त्याचे तुकडे होण्याची शक्यता असते.
- आता त्या तांदळामध्ये खायचा रंग घाला.
- पाणी उकळू लागताच त्यामध्ये केशर घाला आणि 3 शिट्ट्या करुन घ्या.
- शिट्या करून घेतल्यानंतर त्यामध्ये साखर घालून आधी परतून घेतेले सर्व पदार्थ घालून मिश्रण सर्व एकजीव करून घ्या.
- आता झाकण पुन्हा बंद करुन कुकर बाजूला ठेऊन द्या.
- अशाप्रकारे गोड भात तयार आहे.
- भातावर काजू, पिस्ता घालून सर्व्ह करा.