Prepare time: 10 min
Cook: 10
Ready in: 30 min
Ingredients
- 4-5 ब्रेड स्लाइस
- 2 मध्यम बटाटे (उकडलेले आणि मॅश केलेले)
- 1 लहान कांदा (बारीक चिरलेला)
- 2-3 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
- 1 चमचा आलं-लसूण पेस्ट
- 1/2 चमचा लाल तिखट
- 1/2 चमचा हळद
- 1/2 चमचा गरम मसाला
- चवीनुसार मीठ
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- पराठ्यासाठी गहू पीठ
- तेल/तूप
Directions
- एका भांड्यामध्ये उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे घ्या.
- त्यामध्ये चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, गरम मसाला, कोथिंबीर, आणि मीठ हे सर्व घाला.
- मिश्रण चांगलं मिक्स करून घ्या.
- त्यानंतर ब्रेड स्लाइसच्या कडा कापून घ्या .
- प्रत्येक ब्रेड हलकं पाण्यात बुडवून लगेच बाहेर काढा आणि त्यातील पाणी हाताने दाबून बाहेर काढा.
- आता एक पिठाचा गोळा तयार करून घ्या.
- त्यामध्ये ब्रेडचा तुकडा ठेवा आणि तयार केलेले आलू स्टफिंग यामध्ये घाला.
- व्यवस्थित बंद करा.
- पराठा नीट लाटून घ्या.
- पीठ लाटून गोलसर आकार द्या.
- गरम तव्यावर पराठा ठेवा आणि दोन्ही बाजूंनी तूप/तेल लावून भाजा
- गरमागरम ब्रेड आलू पराठा तयार आहे. हा पराठा तुम्ही चटणी किंवा सॉस सोबत खाऊ शकता.