Prepare time: 10 min
Cook: 10
Ready in: 20 min
Ingredients
- ब्रेडचे - 10 तुकडे
- रवा - १/२ कप
- दही- १/२ कप
- तांदळाचे पीठ - 1/2 टीस्पून
- चवीनुसार मीठ
- तेल – २ चमचे
- जिरे- १/२ टीस्पून
- मोहरी - 1/2 टीस्पून
- उडदाची डाळ १ चमचा
- कढीपत्ता २ ते ३
- हिरवी मिरची २
- कांदा १
- आले १/२ इंच तुकडा
Directions
- सर्व प्रथम ब्रेडच्या बाजू कापून घ्या.
- नंतर सर्व ब्रेडचे तुकडे किमान २ मिनिटे पाण्यात भिजवून प्लेटमध्ये ठेवा.
- आता एका भांड्यात रवा, मीठ, तांदूळ पावडर आणि पाणी एकत्र करून याची पेस्ट बनवून घ्या.
- आता ब्रेडचे तुकडे पेस्टमध्ये मिसळून घ्या.
- नंतर त्यामध्ये दही घालून चांगले फेटून घ्या.
- आता एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून.
- यामध्ये, जिरे, मोहरी, उडीद डाळ, कढीपत्ता, आले, कांदा आणि हिरवी मिरची घालून चांगलं परतून घ्या.
- कांदा सोनेरी तपकिरी रंगाचा झाल्यावर गॅस बंद करा.
- आता हे मिश्रण ब्रेड डोसाच्या पिठात मिसळा.
- तवा गरम करून पुसून घ्या.
- त्यावर तयार केले डोशाचे पीठ पसरवा.
- डोसा पातळ झाल्यावर त्याचे दोन भाग करा. या गरमागरम डोशाचे आस्वाद तुम्ही हिरव्या चटणी किंवा सॉससह घेऊ शकता.