लग्नसोहळा हा खूप खास असतो. लग्नाआधी मेहंदी फंक्शन असते आणि त्यानंतर हळदी फंक्शन. या कार्यक्रमात वधूसह सर्वजणी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. सध्या बऱ्याच महिला फॅशनच्या ट्रेंडला फॉलो करतात. पूर्वीच्या काळी हळदीला वधूच पिवळा रंग घालायची परंतु आता कुटूंबातले सर्व सदस्य हळदीला पिवळा रंग परिधान करतात. आजकाल नववधू सुद्धा साडी व्यतिरिक्त लेहंगा किंवा पिवळा सुंदर ड्रेस घालतात. आज आपण जाणून घेऊयात, नववधू हळदीला कोणता हटके लूक करू शकते.
डिझायनर लेहंगा
तुम्ही हळदीला डिझायनर पिवळा लेहंगा घालू शकता या लेहंग्यामध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल.
साडी
तुम्हाला जर पारंपरिक लूक पाहिजे असेल तर तुम्ही पिवळी साडी नेसू शकता. हल्ली पिवळ्या साड्यांमध्ये तुम्हाला असंख्य प्रकार मिळतील. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या साड्यांची निवड करू शकता.
ड्रेस
हळदीला तुम्ही चुडीदार ड्रेस किंवा थ्री पीस ड्रेस देखील घालू शकता. हळदीला हटके लूक देखील मिळेल.
फ्यूजन आउटफिट
हटके लूकसाठी फ्यूजन आउटफिट ट्राय करू शकता पारंपारिक पिवळ्या रंगाचा लहंगा किंवा साडीला आधुनिक ब्लाउज किंवा क्रॉप टॉपसोबत पेअर करून हा लूक करू शकता. . हे फ्यूजन लूक हटके आणि आकर्षक दिसेल.
फ्लोरल ज्वेलरी
पारंपरिक दागिन्यांऐवजी ताज्या फुलांच्या गळ्यातल्या हार, कानातले, ब्रेसलेट्स ट्राय करू शकता. हे लूकला ताजेपणा आणि अनोखा स्टाइल देईल.
बंधेज
हळदी समारंभासाठी बांधणीच्या किंवा बंधेज कापडाचा वापर केल्यास, ते रंगीत आणि हटके दिसेल.
केप स्टाईल दुपट्टा
साध्या लहंग्याला किंवा ड्रेसला केप स्टाईल दुपट्ट्याने सजवा, जेणेकरून तुमचा लूक अधिक स्टायलिश आणि हटके दिसेल.
मिनिमल मेकअप
ग्लॉसी स्किनसाठी मिनिमल मेकअप करू शकता.
हेही वाचा : Wedding Fashion : हे क्लचेस लग्नाच्या सिझनसाठी बेस्ट
Edited BY : Prachi Manjrekar