वाढदिवस, अनिवर्सरी सेलिब्रेशनसाठी हमखास केक ऑर्डर केला जातो. डिसेंबर सुरू असून आता तर ख्रिसमस सण येणार आहे. या दिवशी हमखास केक कापून सण साजरा केला जातो. काही घरी केक बनवतात. पण, घरी परफेक्ट केक तयार करण्यासाठी योग्य बेकिंग टिप्स वापरणे आवश्यक असते. कारण अनेकदा घरी केक बनवताना केक व्यवस्थित बनत नाही किंवा बेक तरी होत नाही आणि केकचा संपूर्ण बेत फसतो. त्यामुळे परफेक्ट केक तयार करण्यासाठी तुम्ही पुढील टिप्स फॉलो करायला हव्यात.
योग्य प्रमाणात साम्रगी –
सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेकिंग करताना सर्व साहित्य योग्य प्रमाणात घ्यायला हवी. साहित्य योग्य प्रमाणात घेण्यासाठी तुम्ही स्केलचा वापर करू शकता. डिजीटल स्केल नसेल तर तुम्ही चमच्याने माप घ्यावे.
रुम टेंमपेरचेरवर साहित्य –
केक बनवताना सर्व साहित्य रुम टेंमपेरचेरवर असणे आवश्यक आहे. बेकिंगमध्ये सर्वात महत्त्वाचे ही स्टेप समजली जाते. दूध, अंडी, लोणी हे पदार्थ फ्रीजमधून आधीच बाहेर काढून ठेवावेत. चुकूनही फ्रीजमधून काढून वापरू नये. तुम्ही या वस्तू फ्रीजमधून 30 ते 40 मिनीटे आधीच बाहेर काढाव्यात आणि त्यानंतर वापराव्यात.
सतत ढवळू नये –
बेकिंग करताना सर्व साहित्य जास्त मिक्स करू नका म्हणजे एकदा ढवळून झाले असेल तर वारंवार मिक्स करू नका. अशाने तुमचे डेझर्ट खराब होऊ शकते.
ओव्हन प्रीहिट करावा –
बेकिंग करताना ओव्हन प्रीहिट करायला विसरू नये. याशिवाय वेळोवेळी तापमानावर लक्ष केंद्रीत करावे.
पॅनचे तापमान –
सर्वात पहिले तर बेकिंग पॅन केकसाठी योग्य आहे का नाही याची खात्री करावी. केक तयार करताना पॅचमेंटचा वापर करावा. कारण जेव्हा तुम्ही बेकिंगसाठी शीट ट्रे किंवा पॅन वापरता तेव्हा ते चांगले ग्रीस होते.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde