Monday, January 13, 2025
HomeमानिनीReligiousChampashashthi 2024 : चंपाषष्ठीला का उचलतात तळी ?

Champashashthi 2024 : चंपाषष्ठीला का उचलतात तळी ?

Subscribe

हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला एख खास महत्त्व आहे. व्रतवैकल्याचा महिना म्हणून मार्गशीर्ष महिना ओळखला जातो. मार्गशीर्ष महिन्याची प्रत्येक तिथी ही कोणत्या न कोणत्या तरी देवाला समर्पित आहे. त्यानुसार षष्ठी तिथी ही महाराष्ट्राचे दैवत खंडोबा यांना समर्पित केली आहे. दरवर्षी ही तिथी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठीला साजरी केली जाते. जिला ‘चंपाषष्ठी’ असं म्हटलं जातं.

चंपाषष्ठी पौराणिक कथा :

पौराणिक कथेनुसार, मणिसूर आणि मल्लासूर नावाचे दोन राक्षस होते. हे दोन्ही राक्षस खूप कुर होते. त्यांच्या अन्याय-अत्याचारने संपूर्ण जग त्रस्त होते. एकंदरीत या राक्षसांनी अन्याय अत्याचाराची सीमा पार केली होती आणि त्यांनी देव, ऋषी आणि मानवाला खूप त्रास दिला. यामुळे ऋषींनी कठोर तपश्चर्येने महादेवाला प्रसत्र करत साकडे घातले. त्यानुसार, महादेवाने खंडोबाचे रूप धारण करत मणिमूर आणि मल्लसूर यांना पराजित केले. खंडोबाराया आणि राक्षसांचे हे युद्ध सलग सहा दिवस सुरु होते. या भीषण युद्धात मणिसुराने महादेवाची क्षमा मागत आपला पांढरा घोडा खंडेरायाला अर्पण केला. या विजयाचा आनंद म्हणून चंपाषष्ठी साजरी केली जाते. या दिवशी तळी उचलण्याची परंपरा आहे

- Advertisement -

खंडोबा मार्तंड भैरव आणि मल्हारी यांसारख्या इतर नावांनीही ओळखले जातात, जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे.मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते, ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते.जेजुरी येथील खंडोबा मंदिरात हा उत्सव मोठ्या थाटामाटात आयोजित केला जातो. यानिमित्ताने खंडोबा देवाला हळद, फळे, भाजीपाला अर्पण केला जातो. येथे जत्राही भरवली जाते.

चंपा षष्ठी शुभ मुहूर्त

तिथीनुसार 7 डिसेंबर, शनिवार रोजी चंपा षष्ठी साजरी होणार आहे.
षष्ठी तिथी 7 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी सुरू होईल.
षष्ठी तिथी 8 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी समाप्त होईल.

- Advertisement -

तळी का उचलतात ?

चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचार असतो, त्यामुळे घरोघरी तळी उचलतात.
ताम्हणामध्ये भंडारा पसरून त्यावर 5 विड्याची पाने, सुपारी, खोबऱ्याचे तुकडे व मधोमध भंडारा खोबरे वाटी ठेवतात. 5 मुले किंवा पुरुषांना बोलावून घट उचलतात व 3 वेळा येळकोट येळकोट म्हणून तळी उचलतात. त्यानंतर तळी भंडारा करुन दिवटी बुधले प्रज्वलित केले जातात.

हेही वाचा :


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini