चाणक्य नीतीचे रचनाकार आचार्य चाणक्य यांना बुद्धिमत्ता आणि विविध विषयातील पारंगतेमुळे आजही श्रेष्ठ विद्वान म्हणून ओळखले जाते. आचार्य चाणक्य एक कुशल, रणनीतीकार आणि एक महान अर्थशास्त्रीसुद्धा होते. चाणक्यांनी अनेक शास्त्रांची रचना केली, ज्यांचा वापर आजही अनेकजण करतात. नुकतंच नवीन वर्ष सुरू झाले आहे. चाणक्यांच्या काही मुल्यांचा अवलंब केला तर 2025 हे वर्ष नक्कीच चांगले जाऊ शकते. चाणक्यांच्या मते, नवीन वर्ष सुरळीत आणि यशस्वी जाण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींचा त्याग करायला हवे, पाहूयात
खोटे बोलणे –
चाणक्य नीतीनुसार, नेहमी खरे बोलावे, कितीही कठीण प्रसंग असल्यास धीर सोडू नये. याशिवाय चुकूनही खोटारडेपणाचा आश्रय घेऊ नये.
खोटे बोलल्याने सद्य स्थिती सुधारली जाते. पण, नंतर या गोष्टींचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे नवीन वर्षात खोटे बोलण्याचा त्याग करावा.
खोटे चेहरे –
नातेवाईक, मित्रमंडळी सुखदु:खात आपला साथ देतात. पण, जर नातेवाईक, मित्रमंडळी आपुलकीचा, काळजीचा आव आणत असतील तर अशा लोकांपासून दुर राहावे.
खोटे चेहरे घेऊन वावरणाऱ्या लोकांपासून दुर राहावे. नवीन वर्षात खोटे वागणाऱ्या लोकांचा त्याग करावा, असे चाणक्य नीतीत सांगण्यात आले आहेत.
परिस्थिती –
मानव म्हटला तर संकटे येणारच. ज्याप्रमाणे सुर्य मावळतो तसो तो उगवतो सुद्धा. अनेकांना कोणतेही संकट आले की हातपाय गाळून बसण्याची सवय असते. पण, चाणक्य नीती सांगते की, मानवाने कोणत्याही परिस्थितीचा न घाबरता सामना करायला हवे. कारण तेव्हाच मानवाच्या गुणांची खरी परीक्षा संकटकाळात होते.
पैसा -पाणी
येणाऱ्या संकटापासून वाचण्यासाठी मानवाने पैशांची बचत करावी. काहींना पैसे आले की खर्च करायची सवय असते.पण, अडीनडीला कोणाकडे मदत मागण्याची वेळ येवू नये असे वाटत असेल तर पैशांची बचत करावी.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde