Friday, January 24, 2025
HomeमानिनीReligiousChanting Mantra Rules : मंत्रजप 108 वेळा करणे शुभ का असते?

Chanting Mantra Rules : मंत्रजप 108 वेळा करणे शुभ का असते?

Subscribe

हिंदू शास्त्रात जप करण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. नामजप केल्याने मन शांत होतेच शिवाय शारीरिक लाभही होतात. साधारणत: जपमाळेने नामजप केले जाते. धर्मग्रंथानुसार रूद्राक्षाची माळ मंत्रजपासाठी उत्तम मानली जाते. मंत्रोच्चारासाठी वापरल्या जाणाऱ्या जपमाळेत 108 मणी असतात. पण, जपमाळेत फक्त 108 मणी का असतात?, मंत्रजप 108 वेळा करणे शुभ का असते? यामागची नेमकी कारणं काय असतील? आज आम्ही तुम्हाला शास्त्रात सांगण्यात आलेले यामागील काही साधारण कारणे सांगत आहोत, समजून घेऊयात

पहिले कारण –

शास्त्रात असे म्हटले गेले आहे की, जपमाळेच्या 108 मण्यांची संख्या संपूर्ण निरोगी व्यक्ती दिवसात किती वेळा श्वास घेते याच्या संख्येशी जोडली आहे. साधारणपणे कमीत कमी व्यक्ती 21600 वेळा श्वास घेते. व्यक्तीचे 24 तासांपैकी 12 तास कामात जातात. उरलेल्या तासात 10800 वेळा श्वास घेतो. शास्त्रात असे म्हटले जाते की, उरलेल्या १२ तासात व्यक्तीने देवाचे ध्यान करायला हवे. पण, हे अशक्य आहे. त्यामुळे 10800 श्वासांच्या संख्येतून शेवटची दोन शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठरविण्यात आली आहे.

दुसरे कारण –

असे म्हणतात की, सर्व भाषांचा जन्म संस्कृत भाषेतून झाला आहे. या भाषेत 54 अक्षरे असतात. प्रत्येक अक्षरात नर आणि मादी असे दोन भाग आहेत. त्यामुळे 54 संख्येला 2 ने गुणले असता 108 ही संख्या येते. त्यामुळे कोणताही जप करण्यासाठी जपमाळेत 108 मणी निश्चित करण्यात आली आहे.

तिसरे कारण –

जपमाळेत 108 मणी असण्याचे आणखीन एक कारण म्हणजे 108 संख्या संपूर्ण विश्नाचे प्रतिनिधित्व करते. शास्त्रानुसार, संपूर्ण ब्रम्हांड 12 राशिंमध्ये विभागले आहे. मेष, वृषभ, मिथून, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशिंमध्ये विभागले आहे. नऊ ग्रहही 12 राशिंमध्ये फिरतात, त्यामुळे जर 12 राशिंच्या संख्येत ग्रहांची संख्या 9 ने गुणली तर 108 संख्या येते.

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini