Sunday, December 15, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीRecipeChicken Crispy Recipe : चिकन क्रिस्पी

Chicken Crispy Recipe : चिकन क्रिस्पी

Subscribe

आपण बऱ्याचदा चिकनचे अनेक पदार्थ बनवतो पण तुम्ही कधी चिकन क्रिस्पी ट्राय केली आहे का ? चिकन क्रिस्पी खूप स्वादिष्ट आणि झटपट देखील बनते. तुम्ही सहजपणे हा पदार्थ बनवू शकता. कोणत्याही खास प्रसंगासाठी चिकन क्रिस्पी उत्तम पर्याय आहे. आज आपण जाणून घेऊयात, चिकन क्रिस्पी कशी बनवायची.

Prepare time: 10 min
Cook: 10
Ready in: 30 min

Ingredients

  • 2 किलो बोनलेस चिकन
  • 1 अंड
  • 4 चमचे कॉर्नफ्लॉवर
  • 2 चमचे मैदा
  • 2 चमचे आले लसूण पेस्ट
  • 1 वाटी कांदा
  • 2 चमचे सोयासॉस
  • 2 चमचे शेजवान चटणी
  • 2 चमचे सोया सॉस
  • 1 चमचा व्हिनेगर
  • चवीप्रमाणे मीठ
  • खाण्याचा रंग

Directions

  1. सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्या.
  2. त्यानंतर त्याचे लहान तुकडे करून त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर, मीठ, मैदा आणि खाण्याचा रंग मिक्स करून घ्या
  3. हे सर्व मिश्रण एकजीव करून बाजूला ठेवून द्या.
  4. एका बाजूला कढईत तेल तापल्यावर तयार केले चिकनचे मिश्रण चांगले फ्राय करून घ्या.
  5. फ्राय केले चिकन टिशूयु पेपरमध्ये काढून बाजूला ठेवा.
  6. एका पॅनमध्ये तेल घालून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट , सोया सॉस, कांदा, व्हिनेगर , शेजवान चटणी घालून मिश्रण परतून घ्या.
  7. त्यानंतर त्यामध्ये फ्राय केले चिकन घालून सर्व मिश्रण आता एकजीव करून घ्या.
  8. आता गरमागरमा चिकन क्रिस्पी तयार आहे.
  9. याचा आस्वाद तुम्ही चटणीसह देखील घेऊ शकता.
- Advertisment -

Manini