Thursday, December 12, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीRecipeChikki Recipe : गुळ - शेंगदाण्याची चिक्की

Chikki Recipe : गुळ – शेंगदाण्याची चिक्की

Subscribe

हिवाळ्यात गुळ-शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. गुळ- शेंगदाण्यातील घटक शरीराला उबदार ठेवतात. त्यामुळे तुम्ही गुळ- शेंगदाण्याची चिक्की बनवू खाऊ शकता. गुळ - शेंगदाण्याची चिक्की बनवण्यास सोप्पी असते. पाहूयात, गुळ - शेंगदाण्याची चिक्की बनवण्याचे साहीत्य आणि कृती,

Prepare time: 15 min
Cook: 15-20 min
Ready in: 30 min

Ingredients

  • गुळ- 1 वाटी
  • शेंगदाणे - 3 ते 4 चमचे
  • तूप

Directions

  1. सर्वात आधी शेंगदाणे भाजून घ्यावेत.
  2. शेंगदाणे थंड झाली की, त्याची साले काढून टाका.
  3. यानंतर एका भांड्यात तूप आणि गूळ नीट मिक्स करून घ्या.
  4. गुळ टाकल्यावर सतत ढवळत राहावे आणि गॅस मंद आचेवरच ठेवावा.
  5. गुळ पूर्णपणे वितळवून घ्या. वितळलेल्या गुळामध्ये शेंगदाणे टाका.
  6. यानंतर ट्रे किंवा प्लेटला तूप लावून घ्या.
  7. तयार मिश्रण ट्रे मध्ये पसरवा आणि समान पसरेल याची खात्री करून घ्या.
  8. तयार चिक्की थंड होण्यासाठी किमान 2 तास तरी ठेवा.
  9. दोन तासांनंतर चिक्कीला हव्या त्या आकारात कापून घ्या.
- Advertisment -

Manini