Saturday, March 22, 2025
HomeमानिनीRecipeChocolate Falooda Recipe : चॉकलेट फालूदा

Chocolate Falooda Recipe : चॉकलेट फालूदा

Subscribe

आता गर्मीला सुरुवात झालेली असून या ऋतू आपलं शरीर वारंवार डिहायड्रेट हॊत असते अशावेळी शरीर हायड्रेट राहण्यासाठी थंडावा मिळण्यासाठी आपण घरात अनेक ड्रिंक्स बनवतो परंतु जर तुम्हाला काही नवीन ट्राय करायचं असेल तर तुम्ही घरी चॉकलेट फालूदा बनवू शकता. आज आपण जाणून घेऊयात घरी चॉकलेट फालूदा कसा बनवायचा.

Prepare time: 10 min
Cook: 20
Ready in: 30 min

Ingredients

  • फालूदा शेव - 1 वाटी
  • दूध - 2 वाटी थंड
  • चॉकलेट सिरप - 3 चमचे
  • चिया सीड्स (सब्जा बीज) - 1 चमचा (1 वाटीपाण्यात भिजवलेले)
  • व्हॅनिला आईसक्रिम - 2 स्कूप
  • चॉकलेट चिप्स - 1 चमचा
  • ड्रायफ्रूट्स (बदाम, काजू, पिस्ता - चिरलेले) - 2 चमचे
  • चॉकलेट शेविंग्स - सजावटीसाठी

Directions

  1. सब्जा बीज 1०-15 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा, जो पर्यत ते चांगले फुलत नाही.
  2. एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात फालूदा शेव 2-3 मिनिटे शिजवून घ्या. नंतर थंड पाण्यात टाकून गाळून घ्या.
  3. थंड दुधात 2 चमचे चॉकलेट सिरप घालून चांगले मिक्स करा.
  4. ग्लास सजवण्यासाठी ग्लासच्या चारी बाजूंनी चॉकलेट सिरप लावा.
  5. त्यामध्ये 1 चमचा भिजवलेले चिया सीड्स आणि फालूदा शेव घाला.
  6. चॉकलेट सिरप मिक्स केलेले थंड दूध घाला.
  7. वरून चॉकलेटे आईसक्रिम आणि चॉकलेट चिप्स घाला.
  8. ड्रायफ्रूट्स आणि चॉकलेट शेविंग्सने सजवा.

Manini