Wednesday, January 15, 2025
HomeमानिनीFashionFashion Tips : बॉडी टाइपनुसार निवडा बेल्ट

Fashion Tips : बॉडी टाइपनुसार निवडा बेल्ट

Subscribe

आपला आऊटफिट परफेक्ट आणि सुंदर दिसण्यासाठी आपण बेल्टचा वापर करतो. बेल्टमुळे आपला आऊटफिट फिट आणि चांगला दिसतो. हल्ली तुम्हाला बेल्टमध्ये देखील असंख्य पर्याय मिळतील. हे बेल्ट तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी मिळतील. तुम्हाला माहिती आहे का ? तुम्ही तुमच्या बॉडी टाइपनुसार देखील या बेल्टची निवड करू शकता.

जर तुम्हाला तुमच्या सिम्पल आऊटफिटला स्टयलिश आणि स्टनिंग लूक द्याचा असेल तर तुम्ही, काही बेल्टची निवड करू शकता. या बेल्टमुळे तुम्हाला हटके लूक मिळेल. आज आपण जाणून घेऊयात, बॉडी टाइपनुसार बेल्टची निवड कशी करावी.

ऑवरग्लास बॉडी शेप

जर तुमचा बॉडी टाइप ऑवरग्लास असेल तर तुम्ही या बेल्टची निवड करू शकता. या बेल्टमध्ये तुम्हाला असंख्य डिझाइन्स मिळतील. हा बेल्ट तुम्ही ए लाइन ड्रेस, हाई-वेस्ट स्कर्ट किंवा फ्लोइ टॉपसह पेअर करू शकता.

पिअर बॉडी शेप

या बॉडी टाइपमध्ये शरीराची रचना आणि कमरेच्या वरचा भाग लहान असतो आणि खालचा भाग मोठा असतो. या बॉडी शेप असलेल्या लोकांनी तुमच्या बॉडीला मॅच होईल असे बेल्ट तुम्ही वापरू शकता याने तुम्हाला एक बॅलन्स आणि सटल लूक मिळेल. हा बेल्ट तुम्ही फिट-एंड-फ्लेयर ड्रेसेस किंवा लॉन्गलाइन टॉप्ससह पेअर करू शकता.

एप्पल बॉडी शेप

जर तुमच्या शरीराचा आकार एप्पल सारखा म्हणजे, पोटाच्या इथून जास्त असेल तर तुम्ही बेल्ट लावल्याने तुमचं पोट दिसणार नाही. यासाठी तुम्ही काही स्टयलिश बेल्टचा देखील वापर करू शकता. तुम्ही तुमच्या आऊटफिट मॅच होईल असा बेल्ट वापरू शकता.

रेक्टेंगल बॉडी शेप

रेक्टेंगल बॉडी शेप असलेल्या व्यक्तींनी स्लिक वेस्ट ड्रेस, ट्राऊजर पँट्स इत्यादी तुम्ही वेअर करू शकता.

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शरीराच्या आकारानुसार बेल्टची निवड करू शकता.

हेही वाचा : Saree Tradition : संस्कृती आणि परंपरा जपणारी भारतीय साडी


Edited By : Prachi Manjrekar

 

Manini