ख्रिसमसच्या दिवशी महिला वेस्टर्न आऊटफिट घालण्याला प्राधान्य देतात. यादिवशी स्टायलिश दिसण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तुम्हालादेखील या खासप्रसंगी एखादा स्टायलिश लूक हवा असेल तर तुम्ही मिडी ड्रेस परिधान करू शकता. आज आपण जाणून घेऊयात काही अशा मिडी ड्रेसबद्दल जे ख्रिसमस पार्टीसाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतात.
प्रिंटेड मिडी ड्रेस :
जर तुम्हाला प्लेन कपड्यांपेक्षा प्रिंटेड कपडे आवडत असतील तर तुम्हाला यामध्ये फ्लोरल, अॅनिमल, कोयरी अशा अनेक प्रिंटस् मिळू शकतील. खास ख्रिसमस लूकसाठी तुम्हाला लाल चेरी आणि जिंगल बेल्स असणाऱ्या डिझाईन्सचा पर्यायही उपलब्ध होऊ शकतो. याप्रकारचे ड्रेसेस तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. या आऊटफिटसोबत तुम्ही हिल्स किंवा मोजडी घालू शकता आणि अॅक्सेसरीज मध्ये चैन टाईप नेकलेस घालू शकता.
हॉल्टर नेक डिझाईन मिडी ड्रेस :
जर तुम्हाला इतरांपेक्षा काही वेगळं आणि हटके दिसायचं असेल तर तुम्ही याप्रकारचा मिडी ड्रेस स्टाईल करू शकता. अशा प्रकारचे मिडी ड्रेस तुम्हाला 800 ते 1500 रूपयांमध्ये मिळू शकतात. या आऊटफिटवर तुम्ही शूज किंवा सँडल परिधान करू शकता आणि ज्वेलरीमध्ये साधेसे कानातले खूप सुंदर दिसतील. या ड्रेसचा नेक हा युनिक असल्यामुळे यावर नेकलेस घालण्याची आवश्यकता नाही.
ड्रेप शोल्डर मिडी ड्रेस :
जर तुम्हाला रॉयल लूक हवा असेल तर तुम्ही ड्राप शोल्डर मि़डी ड्रेसदेखील निवडू शकता. या ड्रेसमध्ये तुम्हाला स्लिट कट असलेला मिडी ड्रेसही उपलब्ध होऊ शकतो. या ड्रेसमध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल. हा ड्रेस तुम्हाला 1000 ते 1500 रूपयांपर्यंत उपलब्ध होऊ शकेल.
शर्ट मिडी ड्रेस :
जर तुम्हाला नवीन काही ट्राय करायचं असेल तर तुम्ही शर्टवाला मिडी ड्रेस देखील ट्राय करू शकता. यामध्येही तुम्हाला प्लेन किंवा प्रिंटेड ऑप्शन्स मिळू शकतात. हा ड्रेस तुम्हाला ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही ठिकाणी मिळू शकेल.
हेही वाचा : Bra & Bralette Difference : ब्रा आणि ब्रालेट मध्ये काय आहे फरक ?
Edited By – Tanvi Gundaye