Prepare time: 10 min
Cook: 20
Ready in: 30 min
Ingredients
- मैदा - 1 कप
- कोको पावडर - 1/4 कप
- बटर 1/2 कप
- साखर - 1/2 कप (पावडर केलीली)
- बेकिंग पावडर - 1 टीस्पून
- चॉकलेट चिप्स - 1/2 कप
- व्हॅनिला इसेन्स - 1 टीस्पून
- दूध - 2-3 टेबलस्पून
- मीठ - 1 चिमूटभर
Directions
- एका मोठ्या भांड्यात बटर आणि साखर एकत्र करून मिश्रण चांगले हलके होई पर्यत फेटून घ्या.
- फेटलेल्या मिश्रणात व्हॅनिला इसेन्स घालून पुन्हा एकदा मिश्रण हलक्या हाताने मिक्स करून घ्या.
- हे फेटलेले मिश्रन एका बाजूला ठेवा.
- यानंतर दुसऱ्या भांड्यात मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर आणि मीठ इत्यादी नीट चाळून घ्या.
- या मिश्रणात बटर साखर घालून, हलक्या हाताने मिक्स करून घ्या.
- आता यामध्ये 1 ते 2 चमचे दूध घाला
- दूध घातल्यानंतर यामध्ये चॉकलेट चिप्स घाला.
- हलक्या हाताने मिक्स करून घ्या.
- आता बाजूला ठेवलेले आणि आता तयार केले दोन्ही मिश्रण एकत्र करून त्यांना गोल आकार द्या.
- बटर पेपर घेऊन त्यावर हे चॉकलेट कुकीज ठेवा.
- हे कुकीज चांगले ओव्हनमध्ये बेक करा.
- ख्रिसमस दिवशी तुम्ही या कुकीजचा आस्वाद घेऊ शकता.