Prepare time: 10 min
Cook: 10
Ready in: 30 min
Ingredients
- दूध 2 कप
- चाॅकलेट – 150 ग्रॅम
- कोको पावडर – 2 चमचे
- साखर - 3 ते 4 चमचे (चवीनुसार)
- कॉर्नफ्लोअर – 2 चमचे
- व्हॅनिला इसेन्स – 1 चमचा
- क्रीम – 1 ते 2 कप
- ड्राय फ्रूट्स (कट केलेले) – सजावटीसाठी
- चॉकलेट चिप्स – सजावटीसाठी
Directions
- एका भांड्यात दूध गरम करून चांगलं उकळून घ्या.
- गरम दुधात कोको पावडर आणि साखर घाला.
- त्यानंतर थोडं कॉर्नफ्लोअर घालून मिश्रण चांगलं ढवळून घ्या.
- आता यामध्ये चॉकलेटचे तुकडे घालून ते पूर्णपणे वितळवून घ्या.
- मिश्रण घट्ट होईपर्यत ढवळत राहा.
- मिश्रण थोडं थंड झाल्यावर त्यात व्हॅनिला इसेन्स आणि क्रीम घाला.
- तयार पुडिंग एका साच्यात घालून फ्रिजमध्ये ४-५ तास सेट होण्यासाठी ठेवा.
- फ्रिजमधून पुडिंग काढून त्यावर ड्राय फ्रूट्स आणि चॉकलेट चिप्सने सजवा.
- तुम्ही हे चाॅकलेट पुडिंग ख्रिसमस दिवशी घरी बनवू शकता.