वास्तूशास्त्रानुसार, घरात शुभ बोलावे असे सांगितले जाते. कारण वास्तू तथास्तू म्हणते असं म्हणतात. नीटनेटकं आणि स्वच्छ घरात लक्ष्मी देवी नांदते आणि आर्थिक अडचणी जाणवत नाही. घरात वास्तूदोष निर्माण होऊ नये यासाठी काही योग्य सवयी अंगी बाळगणे गरजेचे असते. काहींना पुरेशी जागा नसल्याने घरातील कपडे दारामागे लटकविण्याची सवय असते. पण, ही सवय कितपत योग्य आहे. याबाबत वास्तूशास्त्र का म्हणतं जाणून घेऊयात,
- वास्तूशास्त्रानुसार दारातून घरात उर्जेचा प्रवेश होतो आणि त्याद्वारेच उर्जा घराबाहेर पडते. पण, जेव्हा तुम्ही दारामागे कपडे लटकविता तेव्हा ऊर्जेत अडथळा निर्माण होतो. याचा परिणाम कुटूंबावर होऊ लागतो.
- कुटूंबातील सदस्यांमध्ये मतभेद, आरोग्य, पैशांची चणचण या समस्या सुरू होतात. एकदंरच, दारामागे कपडे लटकवल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो.
- शास्त्रनुासार, दारामागे कपडे लटकवणे शुभ मानले जाते. यामुळे वास्तूदोष निर्माण होतो.
- केवळ वास्तूनियमांनुसारच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने दारामागे कपडे लटकविणे योग्य नाही.
- आपण दिवसभर बाहेर घातलेले कपडे दारामागे लटकवल्याने कपड्यांवरील धुण, घाण घरात पसरते. ज्यामुळे घरातील वातावरण दूषित होते.
- धुळ, घाण आणि कपड्यांवरील बॅक्टेरीया आरोग्याच्या तक्रारी निर्माण करणारे ठरू शकते. त्यामुळे बाहेरून आणलेले कपडे थेट दारामागे लावणे टाळायला हवे.
- तुम्ही दारामागे कपडे न लटकवता एका जागी घडी करुन ठेवावे. तुम्ही भिंतीवर हूक करुन त्यावर कपडे लावू शकता.
एकदंरच, दारामागे कपडे लटकवण्याची सवय वास्तूनियंमानुसार आणि आरोग्याच्यादृष्टीने योग्य नाही. तुम्हालाही घरात जर अशी सवय असेल तर सोडणं योग्य ठरेल.
हेही पाहा –