प्रत्येकाला आपले केस मऊ, लांबसडक आणि दाट हवे असतात. पण, बदलती लाइफस्टाइल, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वाढते प्रदुषण यामुळे शरीरासह केसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. केसांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे केसांच्या या तक्रारी वेळीच दूर करायला हव्यात. अशावेळी महागड्या प्रॉडक्टपेक्षा काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता. केसांच्या विविध तक्रारींवर लवंग वापरणे फायदेशीर ठरेल. लवंग आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. तुम्ही लवंगाच्या साहाय्याने केसांचे आरोग्य सुधारू शकता. लवंगामध्ये बीटा कॅरोटीन असते, ज्यामुळे पेशी वाढतात. याव्यतिरीक्त लवंगामध्ये व्हिटॅमिन के सुद्धा आढळते. ज्यामुळे ब्लड सर्कुलेशनला चालना देते. त्यामुळे जाणून घेऊयात लवंग केसांसाठी कसे फायदेशीर ठरते.
वाढीसाठी उपयुक्त –
लवंगाच्या तेलामध्ये केस गळतीसाठी उपयुक्त गुणधर्म असतात. त्यामुळे केसांची वाढ सुधारण्यासाठी फायदेशीर असते.
केस गळती थांबते –
लवंगामध्ये पॉलिफेनॉल आणि अॅटी-ऑक्सिडंट असतात, जे केसांच्या संबधित ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात आणि केस गळती थांबवतात.
डॅन्ड्रफवर प्रभावी –
लवंगामध्ये अॅटी-फंगल गुणधर्म आढळतात. यामुळे केसांतील डॅन्ड्रफ दूर होतो. यासाठी तुम्हाला शॅप्मू करण्यासाठी केस आणि टाळूवर लवंगाचे पाणी मारावे लागेल. या उपायाने काहीच दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.
खाज येत नाही –
लवंग अॅटी-ऑक्सिडंट, अॅटी-व्हायरल गुणधर्मांमुळे टाळूच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानली जाते. यासाठी तुम्ही नियमित केसांना लवंगाचे तेल वापरू शकता.
केस चमकतात –
लवंगाचे तेल स्काल्प स्वच्छ करून त्याचा पोत सुधारतात, ज्यामुळे केस निस्तेज दिसू लागतात आणि केस चमकदार होतात.
लवंगाचे पाणी कसे तयार करेल –
साहित्य –
- लवंग – 10 ते 11
- कढीपत्ता – 9 ते 10
- पाणी – 1 कप
कृती –
- एका पातेल्यात १ कप पाणी उकळवून घ्यावे.
- या पाण्यात लवंग आणि कढीपत्ता उकळण्यास ठेवा.
- पाणी नीट उकळवून घ्या.
- पाणी थंड करून घ्या.
- थंड झाल्यावर पाणी गाळून घ्यावे.
- तयार पाणी 2 आठवडे फ्रीजमध्ये साठवून तुम्ही वापरू शकता.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde