Monday, January 13, 2025
HomeमानिनीHealthWinter Care -सर्दी पडशावर घरगुती काढा फायदेशीर

Winter Care -सर्दी पडशावर घरगुती काढा फायदेशीर

Subscribe

हिवाळ्यात वातावरणातील सततच्या बदलांमुळे हवेत आद्रता वाढते. विषाणूंच्या वाढीसाठी हे पोषक वातावरण असल्याने या दिवसात सर्दी, खोकला , ताप असे आजार डोके वर काढतात. सहा सात दिवस तरी या समस्यांचा त्रास आपल्याला होतो. कारण वातावरणातील या बदलाबरोबर जुळवुन घेण्यास शरीराला साधारणत एक आठवडा एवढा अवधी लागतो. त्यातही बऱ्याचवेळा व्यक्तीच्या रोगप्रतिकारकशक्तीवरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. यामुळे यादिवसात ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असते त्यांना पटकन,सर्दी, पडसे ताप आणि खोकला यासारख्या समस्या होतात. अशा परिस्थितीत, आपण डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे सेवन करतोच. पण हिवाळ्यात किचनमधील काही मसाल्यांचे काढेही रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याबरोबरच सर्दी पडसे दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे सर्दी आणि खोकल्यापासून लवकर आराम मिळतो. त्यासाठी जाणून घेऊया कोणते आहेत हे काढे.

तुळस
सर्दी-खोकला झाल्यास तुळशीचा काढा पिऊ शकता. यामुळे लवकर आराम मिळतो. त्यासाठी पाण्यात दालचिनी, तमालपत्र, एका जातीची बडीशेप, छोटी वेलची आणि काळी मिरी आणि साखर घ्यायची आहे. हे मसाल्याचे जिन्नस औषधी असल्याने ते सर्व गरम पाण्यात चांगले उकळून घ्यावे. नंतर गाळून प्यावे. दिवसातून २ ते ३ वेळा हा काढा घेतल्यास सर्दी पडशावर आराम मिळतो.

- Advertisement -

मीठ पाणी
जर तुम्ही खोकल्याने त्रस्त असाल विशेष करून रात्री झोपतेवेळी खूप खोकला येत असेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने गुळणा करावा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

मध आणि लिंबू
मधासोबत लिंबाचे सेवन केल्याने रात्रीच्या खोकल्यापासून आराम मिळतो. पण ही रेसिपी मुलांवर वापरू नये. ते त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

- Advertisement -

मध-आले
आले खोकल्यावर रामबाण उपाय आहे. यामुळे वेदना आणि घसादुखीपासून आराम मिळतो. आले खिसून त्याच्या रसामध्ये मधाचे थेंब टाकून त्याचे सेवन केल्यास लवकर आराम मिळेल.

हळदीचे दूध
हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. त्यामुळे सर्दी- खोकल्यावर लवकर आराम मिळतो. जर तुम्हाला वारंवार शिंका येत असतील तर त्यावरही हळदीचे दूध उपयुक्त आहे. यामुळे झोपही चांगली लागते.

Kavita Joshi - Lakhe
Kavita Joshi - Lakhe
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -

Manini