Prepare time: 10 min
Cook: 10 min
Ready in: 20 min
Ingredients
- चिरलेला पालक - 1 कप
- फेटलेले दही - 1 कप
- लसूण - 2 ते 3
- तूप
- जिरे
- मिरे पूड
- कोथिंबीर
- मीठ
- पाणी
Directions
- सर्वात आधी एका कढईत तूप गरम करून घ्यावे. तूप गरम झाल्यावर त्यात जिरे आणि लसणाच्या पाकळ्या परतवून घ्याव्यात.
- यानंतर पालक टाकावा आणि परतून घ्यावा.
- पालक 2 ते 3 मिनीटे परतवून झाला की, फेटलेले दही थोडे थोडे मिक्स करावेत.
- यानंतर मिश्रणात थोडे पाणी घालावे आणि मंद आचेवर शिजवावे.
- चवीनुसार मीठ, मिरेपूड घालावे.
- सूप 5 ते 7 मिनीटे शिजू द्यावे.
- आता तयार सूप एका भांड्यात काढून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने गार्निश करावे.
- तुमचे दही पालक सूप तयार झाले आहे, गरमागरम सर्व्ह करावे.