Sunday, March 16, 2025
HomeमानिनीFashionHair care routine : रात्री झोपण्यापूर्वी केस का विंचरावेत?

Hair care routine : रात्री झोपण्यापूर्वी केस का विंचरावेत?

Subscribe

प्रत्येक महिलेला तिचे केस लांबसडक, काळेभोर, जाड आणि मऊ हवे असतात. पण, असे केस करण्यासाठी आपण त्यांची कशी काळजी घेतो हे देखील महत्त्वाचे असते. केसांची निगा राखायची असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही किती वेळा केस विंचरता. केस निरोगी राहण्यासाठी दिवसातून किमान दोन वेळा केस विंचरणे महत्त्वाचे असते. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्य़ापूर्वी केस विंचरल्याने केस तर निरोगी राहतातच शिवाय त्यांचे सौंदर्यही खुलते. सहसा सकाळी केस विंचरले जातात. पण, रात्री केस विंचरण्याची सवय अनेकांना नसते. त्यामुळे जाणून घेऊयात,
रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरणे का महत्त्वाचे असते.

ब्लड सर्कुलेशन

झोपण्यापूर्वी केस विंचरून झोपल्याने ब्लड सर्कुलेशन सुधारते. ब्लड सर्कुलेशन सुधारल्याने केस निरोगी होतात. परिणामी, केसांच्या तक्रारी कमी होतात.

केसांची स्वच्छता

दिवसभर केस मोकळे असल्याने त्यात घाण जमा होते. केसातील घाण स्काल्पमध्ये अडकते. ज्यामुळे केसात कोंडा होणे, खाज येणे अशा समस्या जाणवतात.
या सर्व तक्रारी टाळण्यासाठी तुम्ही झोपण्यापूर्वी केस विंचरायला हवेत. असे केल्याने केसात घाण जमा होत नाही.

केसांना चमक येते

केस रात्री विंचरून झोपल्याने केस गुंतत नाही तसेच स्वच्छही होतात. त्यामुळे केसांची चमक वाढते.

सकाळी केस विंचरणे सोपे जाते –

रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरल्याने सकाळी केस विंचरणे सोपे जाते. ज्यामुळे तुमचा सकाळचा वेळही वाचतो.

केस मजबूत होतात –

रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरून झोपल्याने केसांमध्ये गुंता राहत नाही. ज्यामुळे जेव्हा तुम्ही सकाळी केस विंचरायला जाता तेव्हा केसगळती जास्त होत नाही. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरणे योग्य मानले जाते.

कोंड्यावर उपयुक्त –

रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरल्याने स्काल्पवरील कोंडा दूर होण्यास मदत होते. तसेच स्काल्पच्या अनेक तक्रारी दूर होतात.

ताण कमी होतो –

केसांना रात्री विंचरून झोपल्याने स्काल्पला मसाज होतो. ज्यामुळे धकाधकीने निर्माण झालेल्या ताणापासून मुक्ती होण्यास मदत होते.

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini