देवघर हा घरातील सर्वात पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा भाग आहे. त्यामुळे देवघराची सजावट करताना सौंदर्याबरोबरच शांतता आणि अध्यात्मिक वातावरण कसे निर्माण करता येईल, याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. योग्य प्रकाशयोजना, आकर्षक पूजासामग्री, पारंपरिक तसेच आधुनिक डिझाइन्स यांचा समतोल साधून देवघर सजवता येऊ शकते. तुम्ही काही सोपे आणि प्रभावी उपाय करून देवघर डेकोर करू शकता.
रंगसंगती आणि भिंतींची सजावट
देवघरात हलके आणि शांतीदायक रंग वापरा जसे की पांढरा, हलका पिवळा, सोनेरी किंवा हलका निळा रंग तुम्ही भिंतींची सजावट करू शकता . भिंतींवर धार्मिक चित्रे किंवा मंद प्रकाशात झळकणारे वाल पेंटिंग लावू शकता.
मूर्ती आणि फोटो व्यवस्थापन
देवघरात एका ओळीत किंवा योग्य उंचीवर मूर्ती व फोटो ठेवा.जास्त गोंधळ न करता मूर्तींची संख्या मर्यादित ठेवा, विशेषतः समोरासमोर ठेऊ नका.
पूजेचा मंडप आणि फर्निचर
पूजेचा मंडप आणि फर्निचर लाकडी किंवा मार्बलचा छोटा मंदिर-मंडप अधिक पारंपरिक आणि आकर्षक दिसतो. जर जागा कमी असेल, तर भिंतीवर लाकडी मंदिर लावू शकता.
फुलांची सजावट आणि सुगंध
ताज्या फुलांच्या माळा, तोरण, आणि अगरबत्ती वापरून सुगंधित आणि प्रसन्न वातावरण तयार करा.
पवित्रता आणि स्वच्छता
सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पवित्रता आणि स्वच्छता. देवघर नेहमी पवित्र आणि स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही देवघर नेहमी स्वच्छ ठेवू शकता. देवघरात अनावश्यक वस्तू ठेऊ नका.पूजेचे साहित्य व्यवस्थित ठेवण्यासाठी छोटी कपाटे किंवा बॉक्स वापरा.
हेही वाचा : Home Decor : बजेट फ्रेंडली हाेम डेकाेर टिप्स
Edited By : Prachi Manjrekar