देवदिवाळी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमा तिथीला साजरी केली जाते. या वर्षी देव दिवाळी 15 नोव्हेंबर शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. जिथे एका बाजूला देवदिवाळीला दीपदान केले जाते आणि सर्व देवीदेवतांची विधिवत पूजा केली जाते तिथे दुसऱ्या बाजूला काही वस्तू खरेदी करणंही खूप शुभ समजलं जातं. जाणून घेऊयात देवदिवाळीला काय खरेदी करायला हवे आणि याने कोणते लाभ मिळू शकतात याबद्दल.
देवदिवाळीला खरेदी करा सोने-चांदी :

देवदिवाळीच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करणं खूप शुभ समजलं जातं. सोनं-चांदी तुम्ही दागिन्यांच्या स्वरुपातही खरेदी करू शकता किंवा नाण्यांच्या स्वरुपातही. यादिवशी खरेदी केलेले दागिने खूप लाभदायक समजले जातात.
हेही वाचा : Dev Diwali 2024 : देवदिवाळीला का केले जाते कार्तिक स्नान ?
देवदिवाळीला खरेदी करा नवे घर :

जर तुम्ही नवं घर घेण्याचा विचार करत असाल तर देवदिवाळीच्या दिवशी नवीन घर खरेदी करणं खूप शुभ आहे. तुम्ही यादिवशी जमीन खरेदी करू शकता किंवा घराचा व्यवहार पक्का करू शकता.
देवदिवाळीला घेऊन या नवे कपडे :

देवदिवाळीच्या दिवशी नवे कपडे खरेदी करण्याची परंपरा आहे. विशेष रुपात असं म्हटलं जातं की देवदिवाळीच्या दिवशी लग्नाचा जोडा खरेदी केल्याने वैवाहिक जीवन आनंदी होतं.
देवदिवाळीला खरेदी करा नवे दिवे :
देवदिवाळीच्या दिवशी दीपदान करण्यासाठी नवे दिवे अवश्य आणायला हवे. असं म्हटलं जातं की देवदिवाळीच्या दिवशी नवे दिवे घरी आणल्याने सकारात्मकता वाढते आणि वाईट शक्ती दूर होते.
देवदिवाळीला घेऊन या लक्ष्मी यंत्र :

देवदिवाळीच्या दिवशी घरात लक्ष्मी यंत्राची स्थापना केल्याने घराची प्रगती होते. घराची आर्थिक परिस्थिती सुधारू लागते. आणि संपत्तीशी निगडीत सर्व समस्याही दूर होतात.
हेही वाचा : Tulsi vivah 2024 : तुळशी विवाहाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?
Edited By – Tanvi Gundaye