Monday, April 15, 2024
घरमानिनीDiary- पित्याबरोबरची ती ठरली अखेरची भेट, नौदलात अग्नीवर झालेल्या हिशा बघेलची कहाणी

Diary- पित्याबरोबरची ती ठरली अखेरची भेट, नौदलात अग्नीवर झालेल्या हिशा बघेलची कहाणी

Subscribe

देशसेवा आणि वडिलांचे स्वप्न उराशी घेऊ निघालेल्या मुलीला माहिती नव्हते की, ती आपल्या वडिलांना शेवटचे पाहत आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय नौसेनेत अग्निवीर बनली. परिवार, गावातील मंडळी, आई अशी मंडळी तिच्या या कामगिरीमुळे आनंद व्यक्त करत होते. परंतु ज्या वडिलांना आपल्या मुलीने त्यांचे स्वप्न पूर्ण केलेय हे पहायचे होते ते त्यांना पाहताच आले नाही. पण मुलीला या बद्दल फार उशिराने सांगण्यात आले. एका बाजूला स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पण दुसऱ्या बाजूला दु:ख सुद्धा ते सावरत होते. ही कथा आहे छत्तीगढ मधील १९ वर्षीय हिशा बघेल हिची.

हिशा ही छत्तीसगढ मधील दुर्ग जिल्ह्यातील बोरीगरका गावात राहणारी आहे. अग्निवीर अंतर्गत भारतीय नौसेनेत ती दाखल झाली होती. जेव्हा तिने आपली १६ आठवड्यांची कठोर ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा गावात आली तेव्हा तिच्या स्वागतासाठी मित्रपरिवार, नातेवाईक उपस्थितीत होती. तिची रॅली ही काढली गेली.

- Advertisement -

एका महिन्यापूर्वी झाले होते वडिलांचे निधन
अग्निवीर हिशा हिचे वडिल संतोष बघेल हे रिक्षा चालक होते. कॅन्सरच्या आजारपणामुळे त्यांचे ५ मार्चला निधन झाले होते. परंतु नातेवाईकांनी हिशाला तिच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी तिला कळू दिली नाही. तिला काही काळानंतर वडिलांचे निधन झालेय हे सांगितले गेले. संतोष बघेल यांचे असे स्वप्न होते की, मुलगी शिक्षा हिने शिकून यशस्वी व्हावे, तिला शासकीय नोकरी मिळावी. तर हिशाला सुद्धा सैन्यात जाऊन देशाची सेवा करायची होती. या दोघांचे स्वप्न पूर्ण झाले. हिशाची निवड इंडियन नेवीत झाली आणि त्यानंतर ती ट्रेनिंगसाठी उडीसा मधील चिल्का येथे १६ आठवड्यांसाठी राहिली. हिशाची जेव्हा ट्रेनिंग पूर्ण झाली आणि आपल्या गावात आली तेव्हा तिचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण आतुर झाला होता.

- Advertisement -

घरी पोहचताच आईला केला सलाम
हिशा जेव्हा घराच्या सीमेवर पोहचली तेव्हा तिच्या स्वागासाठी खुप गर्दी झाली होती, डिजेच्या आवाजात सर्वजण नाचत होते आणि तिला पुष्पहार घातले जात होते. घरी पोहचल्यानंतर तिच्या आईने तिचे औक्षण ही केले. घरात गेल्यानंतर तिने प्रथम आईची गळाभेट घेतली. स्वर्गीय वडिलांचा फोटो पाहून त्यांना सुद्धा तिने नमस्कार केला.

अग्निवीर होण्यापूर्वी केली स्वत:ची तयारी
दुर्ग जिल्ह्यातील बोरीगारका गावात हिशा बघेल ही छत्तीसगढ मधील पहिलीच अग्निवीर महिला बनली आहे. हिशाने अग्निवीर अंतर्गत नौसैन्यात ओडिशाच्या चिल्कामध्ये इंडियन नेवी मधून सीनियर सेकेंडरी रिक्रूट मध्ये १६ आठवडे ट्रेनिंग घेतली. तिची ही ट्रेनिंग मार्च पर्यंत होती. २८ मार्चला ती देशाच्या सेवेसाठी पूर्णपणे तयार झाली होती. खास गोष्ट अशी की, हिशाने अग्निवीर बनण्यासाठी स्वत:ला सुद्धा तयार केले. त्यासाठी ती शाळेच्या दिवसात प्रत्येक दिवशी धावायची आणि योगाभ्यासाच्या माध्यमातून स्वत:ला तयार करायची.

संपूर्ण जिल्ह्यातील पहिलीच अग्निवीर
दुर्ग जिल्ह्याती लहानसे गाव बोरीगारकात राहणाऱ्या हिशा ही आता सर्वांसाठी प्रेरणास्थान बनली आहे. तिने गावातील शाळेतच शिक्षण घेण्यादरम्यान सैन्यात जाण्याचे स्वप्न पाहिले. यासाठी तयारी सुद्धा सुरु केली होती. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर उतई महाविद्यालयात तिने प्रवेश घेतला. येथेच हिशा प्रथम एनसीसी कॅडेड झाली. त्यानंतर गावातील तरुणांसोबत धावण्याचा सराव करु लागली होती. अशी करणारी ती दुर्ग जिल्ह्यातील आणि गावातील पहिली आणि एकटी मुलगी होती.

भारत सरकारच्या अग्निवीर योजनेअंतर्गत हिशाच्या स्वप्नांना बळ मिळाले. जसे सप्टेंबर महिन्यात नौसेनेसाठी अग्निवीर योजनेअंतर्गत भरती सुरु केली तेव्हा हिशाने सुद्धा अर्ज केला. हिशाचा फिटनेस पाहता अधिकाऱ्यांनी तिची निवड केली. हिशाच्या या कामगिरीमुळे तिच्या गावातील शाळेसह कॉलेजमध्ये आनंदाचे वातावरण होते.

मुलांचे शिक्षण आणि वडिलांच्या उपचारासाठी ऑटो विकली
हिशाची आई सती यांनी असे सांगितले की, स्वर्गीय वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी काहीही कमी पडू दिले नाही. ते गेल्या १२ वर्षांपासून कॅन्सरशी लढा देत होते. मात्र मार्च महिन्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या उपचार आणि मुलांच्या शिक्षणासाठी जमीन आणि ऑटो विकली. हिशाला सुद्धा आपल्या ट्युशनची फी द्यावी लागेल म्हणून घरातच अभ्यास करायची. आता हिशा अग्निवीर झाली आहे. भारतीय नौसेनेत अग्निवीर योजनेअंतर्गत एकूण ५०० पदांसाठी मुलींची भरती केली जाणार होती. यामध्ये पहिल्या टप्प्यात २०० मुलींची निवड केली गेली. त्यात हिशाचा नंबर लागला होता. तर छत्तीसगढ मधील पहिली महिला अग्निवीरच्या रुपाच मेरिट आणि फिजिकल टेस्टच्या आधारावर हिशाची निवड करण्यात आली होती.

हिशाने दिला हा सल्ला
हिशाने असे म्हटले की, मी दुर्ग जिल्ह्यातील बोरिगारका येथील आहे. मी दुर्ग जिल्ह्यातील एकमेव मुलगी आहे जी अग्निवीर एस एस आर अंतर्गत देशाची सेवा करण्यासाठी निघाली आहे. मला गर्व आहे की, मी दुर्ग जिल्ह्यातील एकमेव मुलगी आहे. मला असे वाटते की, आणखी मुलींनी सुद्धा पुढे जावे, देशाची सेवा करावी, आपले नाव मोठं कराव. माझे असे म्हणणे आहे की, आम्ही सुद्धा देशाची सेवा करु शकतो. माझे सैन्यात जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अन्य मुलींना सुद्धा असे सांगू इच्छिते की, ट्रेनिंगमध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही. आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करावी.

 


हे देखील वाचा: नववर नव्हे तर चक्क ‘या’ जमातीतील वडिलच करतात लेकीशी लग्न

- Advertisment -

Manini