Saturday, June 10, 2023
घर मानिनी Diary 'या' अभिनेत्रीच्या सल्ल्यानंतर परिणीती चोप्राचे बदलले आयुष्य

‘या’ अभिनेत्रीच्या सल्ल्यानंतर परिणीती चोप्राचे बदलले आयुष्य

Subscribe

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा या दोघांचा साखरपुडा दिल्लीतील कपूरथल हाऊसमध्ये पार पडला आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचा नेता राघव चड्ढा (Raghav Chadha) या दोघांच्या रिलेशनशिपने मनोरंजन विश्वाचे लक्ष वेधले होते. नुकताच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा या दोघांचा साखरपुडा दिल्लीतील कपूरथल हाऊसमध्ये पार पडला आहे. साखरपूड्यानंतर हे दोघेही लग्नाच्या तयारीत मग्न झाले आहेत. पण, आपण आज परिणीतीच्या आयुष्यातील एक सोनेरी पान उलघडणार आहोत.

परिणीती चोप्राच्या ही ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राची (Priyanka Chopra) बहिण आहे. हे सर्वांच माहिती आहे. परंतु, परिणीती ही बॉलिवडूमध्ये अभिनेत्री म्हणून काम करण्याचा सल्ला हा प्रियंका चोप्रा नाही, तर बॉलिवडूमधील मोठ्या अभिनेत्रीने दिला अभिनेत्री होण्याचा सल्ला दिल्याचे तिने एका शोमध्ये सांगितले. यानंतर परिणीतीने बॉलिवडूमध्ये पाऊल टाकले. मग, परिणीतीने पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून राणी मुखर्जी (Rani Mukerji) आहे. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे. राणी मुखर्जीच्या सल्लामुळे परिणीती ही बॉलिवडूमध्ये आली आणि त्यांच्या करिअरला वेगळी कलाटणी मिळाली.

- Advertisement -

दरम्यान, २०१४ मध्ये परिणीती चोप्राने फिल्म मेकर करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. तेव्हा परिणीतीने पहिल्या सागंतिले की, राणी मुखर्जीच्या एका सल्ल्याने तिचे नशीब कसे बदलले. सिनेमामध्ये येण्यापूर्वी परिणीती चोप्रा यशराज फिल्म्सच्या अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये काम करत होती आणि तिचा अभिनयाच्या जगात येण्याचा कोणताही विचार देखील तिच्या मनात नव्हता.

- Advertisement -

करण जोहरच्या शोमध्ये परिणीतीने सांगितले की, मला राणी मुखर्जीसाठी मॅनेजर म्हणून काम करत होते. कारण, राणी मुखर्जीची मॅनेजर ही दुसऱ्या अभिनेत्रीच्या कामात व्यस्त होती. यामुळे मला राणी मुखर्जीचे मॅनेजर होण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी मी राणी मुखर्जीसोबत बिग बॉसच्या सेटवर गेली होती. तेव्हा मला राणी मुखर्जीने विचारले की, तू प्रियंका चोप्राची बहिण आहे ना. मग, तू सिनेमात अभिनेत्री म्हणून का काम करत नाही? तेव्हा मी म्हटले की, मॅम मला अभिनेत्री होण्याची इच्छा नाही. यानंतर त्यांनी मला सांगितले की, तू खूप चांगली अभिनेत्री होऊ शकते. त्या एका शब्दाने मी खूप प्रेरित झाली.

 

परिणीती म्हणाली की, राणी मुखर्जीच्या सल्ला दिल्यानंतर फिल्ममेकर मनीष शर्मा यांची भेट घेतली आणि त्यांनी मला कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माच्या घरी पाठविले. तिथे त्यांनी माझे ऑडिशन क्लिप शूट केली. त्या ऑडिशन क्लिमध्ये परिणीतीने करीना कपूर आणि शाहिद कपूर या दोघांच्या ‘जब वी मेट’ सिनेमाचा एक सीनवर अभिनय केला होता.

या ऑडिशन दिल्यानंतर जवळपासून दीड महिन्यापर्यंत शानू शर्माने कोणताही रिप्लाय दिला नाही. यानंतर परिणीतीने यशराज फिल्म्सची नोकरी सोडून दिली आणि अभिनय शाळेच्या शोध सुरू केला. यानंतर एक दिवस मनीष शर्माने त्यांना यशराजच्या ऑफिसमध्ये बोलविले. यानंतर मनीष शर्माने परिणीतीला यशराज फिल्म्सच्या तीन सिनेमासाठी सायन केले.

हेही वाचा – माझ्या घरचे म्हणाले मुलगा शोध… परिणीतीचा साखरपुड्यातील मजेशीर व्हिडीओ व्हायरल

 

- Advertisment -

Manini