Monday, September 25, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Diary Love Story : माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांची अधुरी प्रेम कहानी

Love Story : माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांची अधुरी प्रेम कहानी

Subscribe

संजय आणि माधुरी दोघांच्याही कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. कारण, संजय दत्तचे लग्न झाले होते. घरच्यांनी दोघांनाही सावध केले, पण दोघेही गुपचूप भेटत राहिले.

रुपेरी पडद्यावर रोमान्स करणाऱ्या आणि प्रेमगीते गाणाऱ्या अनेक स्टार्सच्या खऱ्या आयुष्यात अपेक्षित प्रेम मिळालेले नाही. त्यांच्या प्रेमकथेचा चित्रपटांमध्ये आनंददायी शेवट झाला असेल, परंतु वास्तविक जीवनात त्यांचे प्रेम अपूर्णच राहिले. कधी घरच्यांची नापसंती तर कधी समाजाची भीती या-त्या कारणामुळे स्टार्सच्या प्रेम अपूर्णच राहिले. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्रेमाची अपूर्ण गोष्ट सांगणार आहोत. ही प्रेमाची गोष्टी दुसरी तिसरी कोणाची नसून बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि अभिनेता संजय दत्त ( Sanjay Dutt) या दोघांची आहे.

माधुरी दीक्षितने डॉ. श्रीराम नेने यांच्या प्रेमात असेल, पण माधुरीचे पहिले प्रेम श्रीराम नेने नव्हते. माधुरीचे पहिले प्रेम बॉलिवूडचा खलनायक म्हणजेच संजय दत्त होते. एक काळ असा होता की माधुरी ही संजय दत्तच्या प्रेमात बुडाली होती. माधुरी आणि संजयच्या प्रेमाची चर्चा बॉलिवूडमध्ये होत होती. संजय दत्त आणि माधुरी दीक्षित हे दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते, असे त्यावेली बॉलिवूडमध्ये म्हटले जात होते.  27 वर्षांपूर्वी 1991 मध्ये जेव्हा दिग्दर्शक लॉरेन्स डिसूझा यांनी ‘साजन’ चित्रपटासाठी स्टारकास्ट सुरू केली. तेव्हा लॉरेन्सला संजय दत्तच्या जागी आमीर खानला घ्यायचे होते, परंतु आमिरने नकार दिल्यानंतर हा चित्रपट संजय दत्तकडे गेला. त्यावेळी चित्रपटात अभिनेत्रीसाठी त्यांची पहिली पसंती आयशा जुल्का होती, परंतु चित्रपट सुरू होण्यापूर्वीच आयशाला तीव्र ताप आला, त्यानंतर तिच्या जागी माधुरी दीक्षितला घेण्यात आले.

- Advertisement -

या साजन चित्रपटापूर्वीच संजय आणि माधुरी एकमेकांच्या प्रेमात पडले होते, असे म्हटले जाते. या चित्रपटाचे चित्रीकरण आऊटडोअर लोकेशनवर होत असल्याने दोघांनाही एकमेकांसोबत बराच वेळ घालवण्याची संधी मिळाली. त्याचाच परिणाम असा झाला की, या चित्रपटात माधुरी आणि संजयची केमिस्ट्रीही जबरदस्त दिसली. पण, मग जे घाबरत होते तेच झाले. संजय आणि माधुरी दोघांच्याही कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. कारण, संजय दत्तचे लग्न झाले होते. घरच्यांनी दोघांनाही सावध केले, पण दोघेही गुपचूप भेटत राहिले.
संजय आणि माधुरीचा ‘खलनायक’ चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. दरम्यान, 1993 मध्येच संजय दत्त एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशात गेला होता. बहीण प्रिया दत्तने संजय दत्तला फोन करून अशी बातमी दिली, ज्यामुळे अनेकांचे नाते तुटले. प्रिया दत्तने संजयला फोनवर सांगितले की, त्याच्यावर टाडा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय दत्त मायदेशी परतला. तेव्हा कुटुंबीयांऐवजी संपूर्ण पोलीस दल विमानतळावर त्याची वाट पाहत होते. संजयच्या घरीही पोलीस होते. संजयला अटक करण्यात आली. त्यावेळी टाडा हा गुन्हा दाखल करणे म्हणजे तुरुंगवास भोगणे लागले.
पोलिसांनी संजय दत्तला अटक केल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली. संजय दत्तला अटक झाल्यानंतर माधुरीला मोठा धक्का बसला होता. संजयने बॅड बॉय इमेज सोडल्याचे माधुरीला वाटत होते. परंतु, संजयला अटकेनंतर त्यांची सुटका होणे शक्य नव्हते. यानंतर माधुरीने स्वत:ला संजय पासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. माधुरींच्या कुटुंबियांनी तिचे लग्न अमेरिकेतील डॉ. श्रीराम नेनेशी तिचे लग्न लावले. मग, माधुरी ही अमेरिकेत सेटल झाली. लग्नानंतरचा माधुरी काही काळ बॉलिवूड आणि अभिनय क्षेत्रापासूनही लांब राहिली. त्यानंतर ती पुन्हा भारतात परतली तेव्हा तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केले.

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini