Wednesday, February 21, 2024
घरमानिनीDiaryDiary: जेव्हा आशा पारेख यांना नकोसे झाले होते आयुष्य...

Diary: जेव्हा आशा पारेख यांना नकोसे झाले होते आयुष्य…

Subscribe

60 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख या त्यावेळी मेकर्सची पहिली पसंदी होती. आज भले त्या अभिनयापासून दूर आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा त्या बॅक टू बॅक सिनेमांत काम करायच्या. त्या ऐवढ्या प्रसिद्ध होत्या की, त्यांचे चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर असायचे. मात्र त्यांच्या आयुष्यात असा ही एक काळ आला जेव्हा त्यांना आयुष्य नकोसे वाटू लागले होते. हा किस्सा स्वत: आशा पारेख यांनी सांगितला होता. तेव्हाची त्यांची स्थिती अशी झाली होती की, त्या घरातून बाहेर सुद्धा पडत नव्हत्या.

आशा पारेख यांनी 2017 मध्ये दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये असे सांगितले होते की, त्यांचा एक फॅन असा होता त्याच्यामुळे त्यांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. त्यांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले होते. कारण तो फॅन घराच्या गेटबाहेर बसला होता. आशा पारेख यांच्या शेजाऱ्यांनी त्याला तेथून जायला सांगितले तेव्हा त्याने चाकू काढून त्यांना धमकवायला सुरुवात केली होती. त्याने हट्ट धरला होता की, त्याला आशा पारेख यांच्याशीच लग्न करायचे आहे. तर त्या हो म्हणाल्या तरच तो तेथून जाईल.

- Advertisement -

आशा पारेख यांनी म्हटले की, तो काळ फार त्यांच्यासाठी कठीण होता. त्यांनी घराबाहेर जाणेच बंद केले होते. त्या फॅनला समजावून सांगितले तरीही तो तेथून जात नव्हता. जेव्हा या बद्दल पोलिसांना सांगितले तेव्हा त्यांनी त्याच्यावर कारवाई करत थेट त्याला आर्थर रोड तुरुंगात टाकले. तेव्हा कुठे आशा पारेख यांनी घराबाहेर जाण्यास सुरुवात केली होती. पण त्यांची ही समस्या पूर्णपणे टळली नव्हती. तो फॅन त्यांना तुरुंगातून पत्र लिहून पाठवत होता की, मला जामीन मिळवून द्या. मात्र अभिनेत्रीने या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केले.

आशा पारेख यांनी त्यांच्या काळात बहुतांश कलाकारांसोबत काम केले आहे. त्यांनी चाइल्ड आर्टिस्टच्या रुपात करियरची सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या करियरमध्ये ‘दिल देके देखो’, ‘तिसरी मंजील’ ‘कटी पतंग’ सारख्या सुपरहिट सिनेमांत काम केलयं.

- Advertisement -

हेही वाचा- “फिल्म इंडस्ट्री सगळ्यांसाठी नाहीच”, शहनाज गिलचा धक्कादायक खुलासा

- Advertisment -

Manini