Thursday, June 1, 2023
घर मानिनी Diary Diary: बायकोच्या पाया पडून तो निघून गेला...

Diary: बायकोच्या पाया पडून तो निघून गेला…

Subscribe

प्रेम व्यक्त करण्यासाठी वय किंवा मर्यादा पाळल्या जा नाहीत. त्यामध्ये आपल्या मनातील भावना आपल्या प्रिय व्यक्तीला बोलून दाखवायच्या असतात. प्रेमात आत्मविश्वास आणि समजूतदारपणा असेल तर सर्वकाही साध्य होतं असं म्हटलं जातं. पण काही कपल्सला आपल्या आयुष्यात अशा काही परिस्थितींचा सामना करावा लागतो की, नक्की त्यावेळी कोणता ऑप्शन निवडावा हेच कळत नाही. अशीच एक लव्ह स्टोरी एका कपलची आहे.

एका हिंदी वेबसाइटने या कपल्सच्या आयुष्याची कथा जाणून घेतली. खरंतर कपलमध्ये जो बॉडीबिल्डर नवरा आहे त्याचे नाव नंदा असून त्याला इंडियन रॉकच्या नावाने ओखळले जाते. बायकोचे नाव रुपल नंदा असून ती एक प्लस साइज मॉडेल आणि ब्लॉगर आहे. दोघांच्या लग्नाला 12 वर्ष झाली तरीही त्यांच्यातील प्रेम आधीसारखेच आहे.

- Advertisement -

रुपल हिने त्यांच्या नात्याबद्दल म्हटले की, आमची ओळख ही ऑनलाईनच झाली होती. सोशल मीडियावरच एकमेकांशी सुरुवातीला बोलणे सुरु झाले होते. आमच्यात मैत्री वाढली आणि आम्ही भेटलो. भेटल्यानंतर दीपकची पर्सनालिटी आवडली. आम्ही दोघांनी एकमेकांसाठी खुप काही केलेयं.

फिरण्यासाठी असेच गेलो असता दीपकने लग्नाची मागणी घातली. तेव्हाच मंदिरात लग्न ही आम्ही केले. सुरुवातीला घरातल्या मंडळींना हे पटलं नाही पण अखेर त्यांनी आमचं लग्न स्विकारले. लग्नाच्या सुरुवातीला सर्वकाही उत्तम सुरु होतं. पण दीपकची आई नाराज होती. कारण तिच्या मुलाने आपल्या पसंदीच्या मुलीशी लग्न केले होतं. दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन वाद व्हायचे.

- Advertisement -

काही दिवसांनी तर घरातल्यांनी दीपक आणि रुपल यांना घराबाहेर काढले. बँक बॅलेन्स नव्हता ना राहण्यासाठी घरं. काही दिवस मैत्रीणीकडे काढले, भाड्यानो राहिलो. आम्ही कधीच हार मानली नाही. प्रत्येक परिस्थितीला सामोरे गेलो आणि आजवर आम्ही कधीच मागे वळून पाहिलेले नाही. आज हक्काच घर आणि सर्व सुख-सोई असल्याने आनंदित आहोत असे या कपलने म्हटले.

दीपक असे म्हणतो की, आज जे काही आहे ते रुपल हिच्यामुळेच. मला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी साथ देणाऱ्या रुपला माझा गुरु मानतो. मी जेव्हा कधी एखाद्या एवेंटला जातो तेव्हा तिच्या पाया पडून जातो. असे केल्याने त्या कामात यश नक्कीच मिळते असे ही दीपक म्हणाला.


हेही वाचा- Diary- पहीलं प्रेम, सुंदर आभास

- Advertisment -

Manini