Sunday, June 4, 2023
घर मानिनी Diary Diary...वडिलांच्या मृत्यूने तिला निशब्द केलं

Diary…वडिलांच्या मृत्यूने तिला निशब्द केलं

Subscribe

बॉलिवूड मधील एवरग्रीन अभिनेत्री रेखाची रियल लाइफ स्टोरी एखाद्या कथेप्रमाणेच आहे. रेखाचे वडील व तमिळ इंडस्ट्री मधील सुपरस्टार जेमिनी गणेशन यांनी तीन वेळा लग्न केले होते. तर रेखाची आई पुष्पावल्ली हिच्यासोबत गणेशन यांचे संबंध होतेच. पण जेमिनींनी तिच्याशी लग्न केले नव्हते.

जेमिनीने रेखा हिच्या आईला म्हणजेच पुष्पावल्ली हिला कधीच आपली पत्नी म्हणून स्विकारले नाही. ऐवढेच नव्हे तर पुष्पावल्ली या लग्नाशिवायच आई झाल्या होत्या. त्यावेळी सुद्धा जेमिनी यांनी त्यांची साथ दिली नाही. रेखा ही जेमिनी गणेशन आणि पुष्पावल्ली यांची मुलगी आहे. पण आयुष्यभर ती वडिलांच्या प्रेमासाठी झुरत राहिली.

- Advertisement -

आर्थिक कारणामुळे रेखाला वयाच्या 13 व्या वर्षी आपले शिक्षण सोडायचे नव्हते. पण ते सोडून तिला सिनेमांमध्ये काम करावे लागले. जेमिनी हे आपल्या मुलीला सहन सिनेमांमध्ये काम मिळवून देऊ शकले असते. कारण त्यावेळी साउथ सिनेमांमध्ये त्यांचा फार मोठा दबदबा होता. पण जेमिनी यांनी तसे केले नाही.

यामागे एकच नव्हे तर काही कारणं होती. ज्यामुळे रेखाच्या मनात आपल्या वडिलांच्या प्रति फार राग आणि तिरस्कार होता. परंतु जेव्हा 1994 मध्ये जेमिनी यांना जेव्हा रेखाच्या हस्ते लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला तेव्हा अभिनेत्री वडिलांच्या पाया पडली. पण तरीही रेखाच्या मनातील राग शांत झाला नव्हता. याचा अंदाज यावरुन लावू शकतो, जेव्हा २००५ मध्ये जेमिनी गणेशन यांचे निधन झाले त्यावेळी रेखा आलीच नाही.

- Advertisement -

एका मुलाखतीत रेखाला आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी तू नव्हती असा प्रश्न विचारला होता. तेव्हा तिने उत्तर देत असे म्हटले होते की, मी त्यांच्या मृत्यूचे दु:ख का बाळगू जर त्यांच्याशी माझा काही संबंधच नाही. माझ्या आयुष्यात त्यांचे काही खास योगदान नव्हते.


हेही वाचा- Diary: सोळा वर्षाच्या तब्बुचे अफेयर आणि फसवणूक

- Advertisment -

Manini