Thursday, May 25, 2023
घर मानिनी Diary Diary: सोळा वर्षाच्या तब्बुचे अफेयर आणि फसवणूक

Diary: सोळा वर्षाच्या तब्बुचे अफेयर आणि फसवणूक

बॉलिवूड मधील अभिनेत्री तब्बू हिने तमिळ, तेलगु, मल्याळम, बंगला अशा विविध भाषांमधील सिनेमांमध्ये सुद्धा काम केलेय. एक काळ असा होता की, तब्बूचे सौंदर्य आणि स्टारडमची फार चर्चा व्हायची. आजही तिच्या अभिनयाचे कौतुक केले जाते. सिल्वर स्क्रिनवर भले तब्बूने रोमँन्टिक भुमिका साकारल्या नाहीत पण आज ही ती सिंगल आयुष्य जगतेय. पण नेहमीच तब्बूने आजवर लग्न का केले नाही याची चर्चा मात्र आवर्जुन केली जाते.

यामागील खरं कारण असे की, समंथा रुथ प्रभु हिचा आधीचा सासरा. कारण एकेकाळी तब्बू आणि नागार्जुन दोघे रिलेशनशिपमध्ये होते. जवळजवळ ते दोघे १५ वर्षांपर्यंत रिलेशनशिप मध्ये होते. एका इंटरव्युमध्ये स्वत: नागार्जुनने असे म्हटले होते की, तिच्या हृदयात नेहमीच एका व्यक्तीसाठी जागा आहे आणि ती नेहमीच राहिल. पण त्या दोघांच्या प्रेमाची कथा कधीच पूर्ण झाली नाही.

- Advertisement -

नागार्जुन आणि तब्बू, या दोघांची पहिली भेट Ninne Pelladata दरम्यान झाली होती. जेव्हा यांचे रिलेशनशिप सुरु ढाले तेव्हा नागार्जुन याचा विवाह झाला होता. पण त्याच्या पत्नीला याची जराही खबर नव्हती. या दोघांचे एकमेकांवर ऐवढे प्रेम होते की, एकदा तब्बूला भेटण्यासाठी नागार्जुन हा हैदराबादला आला होता. ऐवढेच नव्हे तर अभिनेत्रीने तेथे घर सुद्धा घेतले होते.

- Advertisement -

तब्बूवर जरी नागार्जुन खुप प्रेम करत असला तरीही त्याला आपल्या पत्नीला सोडू शकत नाही. मात्र तब्बू त्याच्यापासून दूर झाली आहे. या दोघांचे २०१२ मध्ये ब्रेकअप झाले होते. यानंतर सुद्धा तब्बूने नाते पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला नाही. हे नाते तुटल्यानंतर ती ऐवढी खचली होती की तिने पुन्हा कधीच लग्नाचा विचार केला नाही.


हेही वाचा- मूलं नाही हे आम्ही स्विकारलंय, तुम्ही केव्हा स्विकारणार ?

- Advertisment -

Manini