Tuesday, May 30, 2023
घर मानिनी Diary Diary: एके काळी जेवण मिळणंही होत मुश्किल,आज आहे सुपरस्टार

Diary: एके काळी जेवण मिळणंही होत मुश्किल,आज आहे सुपरस्टार

Subscribe

आयुष्यात अनेक चढउतारांचा सामना करावा लागतो. काही वेळेस परिस्थिती अशी असते की त्यापुढे आपण हतबल असतो. पण जो या परिस्थितीवर मात करुन पुढे जातो तोच खरा आयुष्यात यशस्वी होतो. सिनेमांमधील काही कथा सुद्धा आयुष्यातील सत्य घटनांवर आधारित असतात. अशातच एक अभिनेत्री आहे जी आजच्या काळात सुपरस्टार आहेच. पण तिचा भुतकाळ पाहिला तर तिला जेवण ही मिळत नव्हते अशी तिची स्थिती होती.

टॉलिवूडसह बॉलिवूडमध्ये सुद्धा आपली ओळख निर्माण करणारी ही अभिनेत्री प्रत्येक वयोगटातील चाहत्यांवर सध्या आपली छाप पाडत आहे. खरंतर ‘पुष्पा’ सिनेमातील ‘ओ अंटावा’ गाण्यातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री म्हणजे सामंथा रुथ प्रभु.

- Advertisement -

मॉडलिंगपासून सुरुवात
बालपणापासून अगदी साधीराहणीमान असणारी सामंथा हिला ग्लॅमरच्या जगात यायचे वेड होते. यामुळेच तिने मॉडलिग पासून आपल्या करियरची सुरुवात केली. परंतु या दरम्यान सामंथा घराचा खर्च उचलण्यासाठी पार्ट टाइम जॉब करायची. मॉडलिंग करताना तिला ‘ये माया चेसाव’ ची ऑफर मिळाली. तिचा डेब्यू फिल्म हिट झाला. या सिनेमाला सामंथाला बेस्ट डेब्यु एक्ट्रेसचा सुद्धा अवॉर्ड मिळाला होता.

- Advertisement -

जेवणासाठी सुद्धा नसायचे पैसे
सामंथाने एका इंटरव्युमध्ये असे म्हटले होते की, ती अभ्यासात खुप हुशार होती. मात्र आई-वडिलांकडे ऐवढे पैसे नव्हते की तिला ते शिकवतील. सामंथाने म्हटले की, तिचे आई-वडिल तिला नेहमीच म्हणायचे की, खुप शिक्षण घे आणि यामधून तु खुप काहीतरी मोठं करशील. सामंथाने आर्थिक तंगीमुळे लहान-मोठी नोकरी केली. पहिला सिनेमा मिळण्यापूर्वी सामंथाची परिस्थिती ऐवढी बिकट होती की, तिच्याकडे जेवणासाठी सुद्धा पैसे नसायचे.

खुप नाव कमावले
सामंथाने ज्युनियर एनटीआर, अल्लू अर्जुन आणि नानी सारख्या साउथ सिनेमांमध्ये बड्या कलाकारांसोबत काम केलेच पण हिट सिनेमे हे दिले. हे कलाकार सामंथाला खुप लकी मानायचे. सामंथाने साउथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य याच्यासोबत लग्न केले होते. परंतु काही वर्षातच ते दोघे वेगळे झाले. सामंथा आता साउथसह हिंदीतील प्रेक्षकांमध्ये खुप प्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे. तसेच बॉलिवूड मधील निर्माते-निर्देशक सुद्धा तिला आपल्या सिनेमांत काम करण्यासाठी विचारतात.


हेही वाचा- Diary…वडिलांच्या मृत्यूने तिला निशब्द केलं

- Advertisment -

Manini