Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Diary एक तृतीयांश महिलांवर लादलं जात मातृत्व

एक तृतीयांश महिलांवर लादलं जात मातृत्व

Subscribe

जगभरातील प्रत्येक चार पैकी एक आणि भारतातील तिसऱ्या महिलेला प्रेग्नेंसीदरम्यान मारहाणीचा सामना करावा लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, घरगुती हिंसाचारमुळे प्रेग्नेंट महिलांची हाडं मोडली जाणे, दात तुटणे, कानाचे पडदे फाटणे आणि डोळे फुटतात अशी भयंकर प्रकरण समोर येतात.(Domestic violence during pregnancy)

त्यांच्या नर्वस सिस्टिम ते प्रायव्हेट पार्ट्सवर याचा वाईट परिणाम होतो. काही प्रकरणी तर पोटावर लाथ मारल्याने ही मुलाचा मृत्यू होतो. युनाइटेड नेशंसच्या मते, नाइजिरिया नंतर भारत जगातील दुसरा असा देश आहे जेथे सर्वाधिक गर्भवती महिला किंवा बाळांचा जन्माआधीच एका महिन्यातच मृत्यू होतो. काही काळापूर्वी आयआयटी पटनाचा रिपोर्टमध्ये असे सांगितले होते की, डोमेस्टिक वॉयलेंसच्या शिकार 74 टक्के गर्भवती महिलांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो.

- Advertisement -

प्रेग्नेंसी दरम्यान घरगुती हिंसाचाराचे हे आहेत मोठे धोके
मिसकॅरेज आणि अबॉर्शन
नानावटी मॅक्स सुपर स्पेशियलिटी हॉस्टिपटलमध्ये गायनेकॉलॉजिस्ट असे सांगतात की, मारहाणीदरम्यान पोटावर जोर पडल्याने किंवा थेट पोटाला मार लागल्याने बाळ मिसकॅरेज होते. काही वेळेस दुखापत झालीय हेच कळत नाही आणि इंटरनल ब्लिडिंग होते. यामुळे गर्भातील बाळासह आईसाठी जीवघेणा ठरु शकतो.

स्टिलबर्थ
घरगुती हिंसाचारामुळे स्टिलबर्थची शक्यता 3 पटींनी वाढते. 20 आठवड्याच्या प्रेग्नेंसीदरम्यान गर्भातील किंवा डिलिवरी दरम्यान मृत बाळाच्या जन्माला स्टिलबर्थ असे म्हटले जाते. महिलेला प्रेग्नेंसी दरम्यान मारहाण केल्यानंतर दुखापत झाल्यास तर गर्भाशयातील बाळाला सुरक्षा देणारी ए्म्नियोटिक फ्लूड्सची पिशवी फाटली जाते. ज्यामुळे पाणी बाहेर पडू लागते आणि गर्भाशय आकुंचन पावले जाते. प्लेसेंटा गर्भाशयातून वेगळे हेते ज्याला प्लेसेंटल एबरप्शन असे म्हटले जाते. यामुळे बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा होत नाही.

- Advertisement -

काही वेळेस प्लेसेंटल एबरप्शनचे कळत नाही. 20 ते 27 आठवड्यादरम्यान भ्रुणाचा मृत्यू अर्ली स्टिलबर्थ असे म्हटले जाते. 28 ते ३६ आठवड्यादरम्यान असे झाल्यास प्रेग्नेंसी कॉम्प्लिकेटेड होते. तर 37 व्या आठवड्यात प्लेसेंटल एबरप्शनचा धोका होऊ शकतो.

प्रीमॅच्योर बर्थ
जगभरात प्रत्येक वर्षाला 1.29 कोटी बाळांचा जन्म वेळेआधीच होतो. 37व्या आठवड्यापूर्वी होणाऱ्या या डिलिवरीला प्रीमॅच्योर बर्थ आणि प्री-टर्म बर्थ असे म्हटल जाते. जर्नल प्लॉसच्या आकडेवारीनुसार प्री-टर्म बर्थचे एक तृतीांश प्रकरणे ही अफ्रिका आणि एशियातील असतात. ज्यामध्ये भारताचा सुद्धा समावेश आहे. प्रेग्नेंसी दरम्यान मारहाण झाल्यास बाळाच्या जन्माचा धोका तीनपट अधिक वाढला जातो. (Domestic violence during pregnancy)

13 पैकी 4 महिलांची इच्छा नसताना होतात प्रेग्नेंट
लग्नानंतर महिलांना काही नवऱ्यांची जोर-जबरदस्ती सहन करावी लागते. ते शिक्षेच्या रुपात कंडोमशिवाय संबंध ठेवण्यास दबाव टाकतात. द इंटरनॅशनल जर्नल ऑफ गायनेकोलॉजी अॅन्ड ऑब्सेट्रिक्सच्या मते 13 पैकी 4 महिलांची इच्छा नसताना सुद्धा प्रेग्नेंट होतात. त्यानंतर नवरा बर्थ कंट्रोलसाठी कोणतेही गर्भनिरोधकचा वापर करत नाही आणि महिला प्रेग्नेंट झाल्यानंतर ही गर्भपातासाठी सुद्धा दबाव टाकतात.


हेही वाचा- रागीट नवऱ्याला असं करा कंट्रोल

- Advertisment -

Manini