Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Diary घरात बसून कमावते करोडो रुपये, लोकांना देतेय 'हे' 5 success mantra

घरात बसून कमावते करोडो रुपये, लोकांना देतेय ‘हे’ 5 success mantra

Subscribe

एक महिला घरी बसून दरवर्षी कोट्यवधी रुपये कमावित आहे आणि आता तिच्या यशामागील काही गोष्टी तिने सांगितल्या आहेत. या महिलेचे नाव क्रिसली लिम (Chriselle Lim) आहे. छंद म्हणून ती जे काम करायची तेच आता त्यांनी ड्रीम जॉब बनविले आहे. ख्रिसलीने सोशल मीडियावर सांगितले की, तिने एका छोट्या ब्लॉगपासून कशी सुरुवात केली आणि आता फॅशनच्या क्षेत्रातील एक नावाचलेली व्यक्ती आहे.

द सनच्या रिपोर्टनुसार, क्रिस्लीला सोशल मीडियावर ‘श्रीमंत आई’ असे बोलले जाते. क्रिस्लीने टिकटॉकवर एक व्हिडिओ पोस्ट करून त्याने लोकांना यशासाठी आवश्यक असलेल्या पाच टिप्स दिल्या आहेत. क्रिस्ली म्हणतो, ‘बर्‍याच लोकांनी मला विचारले, ‘तू फक्त श्रीमंत आहेस का?’ तर नाही, मी माझ्या आयुष्यातील गेली 12 वर्षे कठोर परिश्रम करत आहे आणि तुम्हीही केली पाहिजे. क्रिसलीने सांगितले की, तिने फॅशन ब्लॉगची सुरुवात केवळ छंद म्हणून केली. या फॅशन ब्लॉगची सुरुवात तिने दहा वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना केली होती.

- Advertisement -

क्रिसलेचे यश हे कालांतराने वाढत गेले. तिने जगभर प्रवास केला आहे. जगभरातील टॉप डिझायनर्ससोबत देखील काम केले आहे. क्रिसलेने बार्बी डॉल्स देखील तयार केल्या आहेत आणि तिने परफ्यूम आणि कपड्यांची स्वतःची लाइन लाँच केली आहे. आता त्यांनी लोकांना यशस्वी होण्यासाठी पाच टिप्स दिल्या आहेत.

‘या’ आहेत 5 टीप्स

  • तुमचा ‘उद्देश’ जाणून घेऊन सुरुवात होईल.
  •  दर आठवड्याला यूट्यूबवर आणि दररोज ब्लॉगसाठी व्हिडिओ अपलोड करते.
  • तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात, त्याच क्षेत्रात काम करणारे लोक शोधणे, जेणेकरून तुम्ही एकत्र काम करू शकाल.
  • काही काम फुकटातही करावे, जेणेकरून नवीन कौशल्ये शिकता येतील.
  • धीर धरा आणि काम कितीही कठीण असले, तरी कधीही हार मानू नका.
- Advertisement -

क्रिस्लीचा व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल झाला असून या व्हिडिओला 8 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक त्याचे खूप कौतुक करत आहेत.

- Advertisment -

Manini