संघ लोक सेवा आयोगाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या प्रशासनिक सेवा परिक्षेत पास होणे काही तरुणांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करणे अगदी सोपे नसते. कारण आयएएसची परीक्षा फार कठीण असते. या परीक्षेला पास करणे आणि सिविल सर्विसेजमध्ये येण्यासाठी काही लोक काही वर्ष मेहनत करतात. कठीण परिश्रम आणि अभ्यास करुन विद्यार्थी युपीएससीच्या परीक्षेत पास होतात. याच विद्यार्थ्यांमध्ये अशी काही लोक असतात जे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकऱ्या सोडतात. अशा प्रकारच्या यशाच्या कथांमध्ये मुलींचे सुदअधा नाव आहे. अशीच एक महिला आयएसएस आहे, तिने अधिकारी होण्यासाठी स्वत:ला 6 महिने खोलीत बंद करुन घेतले होते. आयएसएस बनण्याची जिद्द होती. पण घरातील मंडळींना तिचे ते पटत नव्हते. मात्र जेव्हा युपीएसएसीची परीक्षा पास झाली तेव्हा तिची मेहनत सर्वांना दिसली. या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे निधी सिवाच.
निधि सिवाच हरियाणाातील गुरुग्राम मध्ये राहणारी आहे. तिने 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यानंतर इजिनिअरिंग करण्याचे ठरविले. 12 वी ची परीक्षा पास केल्यानंतर निधि सिवाचने मेडिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. तिने उत्तम गुणांसह मॅकेनिकल इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली.
मॅकेनिकल इंजिनिअर निधी सिवाचला हैदराबाद मधील एका कंपनीत नोकरी मिळाली. ती हरिणात नोकरीसाठी गेली. दोन वर्ष निधीने नोकरी केली. पण तिला त्या दरम्यान जाणवले की मला नोकरी करायची नाही. तर आयएएस बनायचे आहे. तिची नोकरी व्यवस्थितीत होती. मात्र तिने प्रशासिक सेवेत जायचे ठरवले आणि नोकरी सोडली.
निधीने युपीएएसी परीक्षेची तयारी सुरु केली. पूर्ण मेहनतीने प्रशासनिक सेवेत सहभागी होण्यासाठी ती सातत्याने अभ्यास करत होती. तिचे पूर्ण लक्ष हे युपीएसएसी परीक्षेवर होते. ती दोनवेळा त्यामध्ये नापास झाली. सातत्याने परीक्षेत नापास होत असल्याने आणि नोकरी सुद्धा नव्हती त्यामुळे तिच्यावर दबाव टाकला जाऊ लागला होता.
घरातील मंडळींना असे वाटत होते की, तिने लग्न करावे. तिच्याकडे दोन ऑप्शन होते. एकतर परीक्षेच पास होणे, दुसरा म्हणजे लग्न करणे. घरातल्यांनी अशी अट ठेवली होती की, यावेळी जर नापास झाली तर तिचे लग्न केले जाईल. निधीने घरातील मंडळींची ही अट मान्य केली. तिने ठरवले की, यावेळी तिला आयएएसची परीक्षा उत्तीर्ण व्हायचेच आहे.
निधिला आपल्या तिसऱ्या प्रयत्नात परीक्षेत पास व्हायचे होते. त्यामुळे तिने अधिक मेहनत करण्यास सुरुवात केली. निधिचा पूर्ण फोकस शिक्षणावरच होता. यासाठी तिने स्वत:ला एका खोलीत बंद करुन घेतले. ती खोलीतून बाहेर यायची नाही. संपूर्ण वेळ अभ्यासासाठी द्यायची. घरातील मंडळींशी बोलणे सुद्धा फार कमी केले होते. निधिने कोणत्याही कोचिंग क्लास शिवाय अभ्यास केला. तिसऱ्या वेळेस जेव्हा पूर्ण अधिक मेहनतीने तिने यासाठी तयारी केली तेव्हा ती अखेर पास झाली. ती 83 वा रँक मिळाला. अशातच तिने जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण झाले.
हेही वाचा- कोण आहे देशातील सर्वात उंच बास्केटबॉल खेळाडू पुनम चतुर्वेदी