Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Diary इशिता किशोर 7 वर्षाची असताना वडिलांचे निधन; UPSC परीक्षेच्या टॉपरची कहाणी

इशिता किशोर 7 वर्षाची असताना वडिलांचे निधन; UPSC परीक्षेच्या टॉपरची कहाणी

Subscribe

दरवर्षी यूपीएससीच्या परीक्षेची (UPSC 2022) लाखोच्या संख्येने विद्यार्थी तयारी करतात. परंतु, ही यूपीएससीची परीक्षा खूप कमी लोक क्लिअर करतात. नुकतेच यूपीएससीच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. यात यूपीएससीच्या परीक्षेत इशिता किशोर (Ishita Kishore) ही भारतात प्रथम आली आहे.

यूपीएससीच्या परिक्षेत 2022मध्ये टॉप 10 मध्ये 4 मुलींनी बाजी मारली आहे. इशिता किशोरने यूपीएससीच्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळवत मुलींसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.

- Advertisement -

कोण आहे इशिता किशोर

- Advertisement -

इशिता नोएडामध्ये रहत असून इशिताने एअरफोर्स बाल भारती स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर इशिता ही दिल्ली विद्यापीठातील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये अर्थशास्त्रातून पदवीधर झाली आहे. तसेच इशिताने सुब्रतो कपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

इशिता 7 वर्षाची असताना वडिलाचे निधन

इशिताचे वडील विंग कमांडर संजय किशोर हे हवाई दलाचे अधिकारी होते. 2004 साली तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी इशिताचे वय केवळ सात वर्षांचा होते, ते दु:ख समजून घेणे आणि सहन करणे तिच्यासाठी खूप कठीण होते. पण, हार मानण्याऐवजी तिच्या आईने धैर्य दाखवले. इशिताच्या वडिलांच्या निधनानंतर ती दिल्लीत आली आणि तिची आई एका शाळेत शिक्षिका म्हणून शिकवू लागली. इथे आल्यानंतर हळूहळू इशिताचे संपूर्ण लक्ष अभ्यासाकडे वळले.

नोकरी सोडून UPSCची तयारी केली

मी नोकरी सोडून यूपीएससीच्या परीक्षेची तयारी केली आहे. यूपीएससीच्या परीक्षेत पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा तरी यश मिळेल, असे ठरवून मोठ्या पगाराची नोकरी सोडली. परीक्षेसाठी दिवसातून 8 ते 9 तास अभ्यास करत होते. मी दोन वेळा प्रीलिम्सच्या पुढे देखील केली नव्हती. तेव्हा तिच्या आईने सांगितले की, आयुष्यात काही परिस्थिती असतात, जिथे आपण फक्त लढू शकतो. यावेळी आपण लढत राहिले पाहिजे, असे तिच्या आईने हिम्मत दिल्यामुळे आज ती यशस्वी झाली.

मेहनतीचे फळ

पीटीआयच्या वृत्तानुसार, इशिता किशोरने तिच्या यशाबद्दल एका मुलाखतीत सांगितले की, तिने परीक्षा आणि मुलाखतीसाठी खूप मेहनत घेतली होती आणि जेव्हा ती यूपीएससीची परीक्षा पास झाली तेव्हा खूप आनंद झाला. इंटरव्ह्यूसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मेहनतीची गरज होती. तुम्ही कठोर परिश्रम करत राहायला हवे आणि स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होऊन देशाची सेवा करायची आहे, असेही इशिता म्हणाली.


 

हेही वाचा – अंदमान मधील आदिवासींची सेवा करणाऱ्या नर्सची कहाणी

- Advertisment -

Manini