Monday, May 29, 2023
घर मानिनी Diary स्लम प्रिंसेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलीचा धारावी ते हॉलिवूड प्रेरणादायी प्रवास

स्लम प्रिंसेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलीचा धारावी ते हॉलिवूड प्रेरणादायी प्रवास

Subscribe

सिटी ऑफ ड्रीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील एका मुलीचे आयुष्य रॉबर्ट हॉफमॅन (Robert Hoffman) पूर्णपणे बदलेले आहे. या मुलीला स्लम प्रिंसेस म्हणून ओळखले जाते. या मुलींचा धारावी (Dharavi) ते हॉलिवून (Hollywood) असा प्रेरणादायी प्रवास आहे. ही मुली नक्की कोण आहे?, याबद्दल आपण आज जाणून घेऊ या…

जेव्हा हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट 2020 मुंबईत आले होते. त्यावेळी रॉबर्ट हॉफमॅन हा मलीशा खारवा (Maleesha Kharwa ) या नावाच्या चिमुकलीला भेटला होता. जेव्हा मलीशा ही रॉबर्ट हॉफमॅनला भेटली, तेव्हा रॉबर्टने तिच्यासाठी ‘गो फंड मी’ नावाचे पेज सुरू करण्याचे ठरविले. यानंतर मलीशा फेमस होण्यास सुरुवात झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maleesha Kharwa (@maleeshakharwa)

- Advertisement -

मलीशा ही सध्या सोशल मीडियावर फेमस झाली असून तिला दोन हॉलिवूड चित्रपटांच्या देखील ऑफर्स आल्या आहेत. मलीशाने ‘लिव योर फेयरीटेल’ या शॉर्ट फिल्ममध्ये देखील काम केले आहे. आपण ही शॉर्ट फिल्म युट्यूबर देखील पाहू शकतो. या शॉर्ट फिल्ममध्ये पाच लहान मुलांची कथा दाखवण्यात आली आहे. जे पहिल्यांदा हॉटेलमध्ये जेवायला जातात. 14 वर्षाची मलीशा ही आता ‘द युवती कलेक्शन’ या ब्रँडचा चेहरा बनली आहे. या ब्रँडच्या प्रत्येक प्रोडक्टवर मलीशाचा फोटो आहे.

- Advertisement -

मलीशा  सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

मलीशा ही सध्या सोशल मीडिया अॅक्टिव्ह आहे. मलीशा ही इन्स्टाग्रामवर  235K फॉलोवर्स आहेत. मलीशा ही विविध पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते. या पोस्ट शेअर करताना मलीशा ही अनेकदा  The Princess From The Slum या हॅशटॅगचा वापर करते. त्यामुळे मलीशाला ‘स्लम प्रिंसेस’या नावाने देखील ओळखली जाते. मलीशा ही तिच्या विविध फॉटोशूटचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर शेअर करते.

- Advertisment -

Manini