वयाच्या ११ व्या वर्षातील मुलं व्हिडिओ गेम्स आणि फास्ट फूड्स व्यतिरिक्त कोणत्या दुसऱ्या गोष्टींबद्दल अधिक विचार करत नाही. मात्र पिक्सी कर्टिस नावाची मुलगी विदेशात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जाते. ती आलिशान आयुष्य जगतेच पण वयाच्या 11 व्या वयात ती करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे. ऐवढेच नव्हे तर ती एक यशस्वी बिझनेस वुमन आहे. तिची कंपनी पिक्सी फिडगेट्स मुलांची खेळणी, कपडे आणि अन्य सामानाची विक्री करतात.
द सनच्या रिपोर्ट्सनुसार, पिक्सी 72 कोटींपेक्षा अधिक संपत्तीची मालकीण आहे. असे म्हटले जाते की, ती वयाच्या 15 व्या वर्षी आपल्या कामातून निवृत्ती घेणार आहे. ती युरोपात प्रायवेट जेटमध्ये सुट्टी घालवते. मोठ्यांप्रमाणेच ती आपली स्किन उत्तम राहण्यासाठी विविध ब्युटी ट्रिटमेंट सुद्धा करते. तिच्याकडे आलिशान गाड्या सुद्धा आहेत. पीक्सीचे इंस्टाग्रामवर 1,36,000 पेक्षा अधिक फोलोअर्स आहेत. मात्र तिच्या अशा लाइफस्टाइलमुळे काही लोक टीका सुद्धा करतात.
View this post on Instagram
पिक्सीची आई सुद्धा अशाच प्रकारची आलिशान लाइफस्टाइल जगते. आधीच तिने आपल्या मुलीसाठी कारसाठी 1,93,000 पाउंड खर्च केले. त्यापैकी 43 हजार पाउंडच्या मर्सिडीज बेंजचा समावेश आहे.
हेही वाचा- कोण आहे देशातील सर्वात उंच बास्केटबॉल खेळाडू पुनम चतुर्वेदी