Saturday, September 23, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Diary मुघल शासकांच्या असायच्या अनेक बेगम

मुघल शासकांच्या असायच्या अनेक बेगम

Subscribe

हिंदूस्तानावर मुघलांनी दीर्घकाळ शासन केले. असे म्हटले जाते की, मुघल शासनाचा काळ सन 1526 ते 1707 पर्यंत होता. याचा पाया बाबर याने घातला होता. मात्र बाबर नंतर काही बादशाहांनी साम्राज्य केले. यापैकी असे काही बादशाह होते ज्यांच्याबद्दल नेहमीच जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक असायचे. जसे की, बादशाह अकबर, बादशाह औरंगजेब. (Mughal Empire and his wives)

प्रत्येक बादशाहची एक स्वतंत्र ओळख होती. लढाई असो किंवा प्रेम अथवा शिल्पकला. याबद्दल तुम्ही कधीना कधी ऐकलेच असेल. मात्र असे काही मुघल बागशाह होते ज्यांच्या एक, दोन नव्हे तर काही बेगम होत्या.तुम्ही मुघल साम्राज्यावर आधारित काही पुस्तके जरुर वाचली असतील. त्यामध्ये सुद्धा लिहिले आहे की, बादहशांच्या काही राण्या असायच्या. मात्र नक्की असे का होते, या बद्दल स्पष्टपणे टीप्पणी मिळालेली नाही. परंतु असे म्हटले जाते की, बादशाह आपला परिवार वाढवण्यासाठी असा करायचा. असे केल्याने मुघल बादशाहला मुलं मिळायचे.

- Advertisement -

काही बेगम अशा सुद्धा होत्या की, ज्या गरिब परिवारातील होत्या. असे केल्याने त्यांना एक नाव मिळायचे. तर काही बेदम अशा होत्या ज्यांच्याशी लग्न करणे हा एक राजकिय करार होता.

बादशाह हुमायू
मुघल साम्राज्यातील सर्वाधिक ताकदवान शासक हुमायू होता. त्याचे पूर्ण नाव नसीरुद्दीन हुमायू असे होते. जर त्याच्या राण्यांबद्दल बोलायचे झाल्यास तर एकूण किती होत्या हे सांगणे मुश्किल होईल. परंतु असे सांगितले जाते की, हुमायूच्या एकूण चार बेगम होत्या. जसे की, माह चुचक बेगम, बेगा बेगम. मात्र यापैकी हमीदा बानो बेगमचे नाव सर्वात वरती होतो.

- Advertisement -

बादशाह अकबर
अकबरचे लग्न किंवा बेगम बद्दल बोलले जाते तेव्हा जोधाचे नाव जरुर घेतले जाते. मात्र तुम्हाला माहितेय का, जोधा बाईच केवळ अकबरची बेगम नव्हती. तर काही बेगम सुद्धा होत्या ज्यांची नावे इतिहासांच्या पानावर लिहिली गेली आहेत. परंतु अकबरच्या बेगम बद्दल इतिहासकारांमध्ये काही मतभेद आहेत. तर आइए-ए-अकबरी मध्ये 11 बेगमचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

बादशाह जहांगीर
जहांगीरचे नाव सुद्धा या लिस्टमध्ये येते. अकबर नंतर मुघल साम्राज्यातील सर्वाधिक महान बादशाह जहांगीर होता. जहांगीरचा जन्म 31 ऑगस्ट 1569 रोजी सिंध फतेहपुर सीकरमध्ये शेख सलीम चिश्ती यांच्या घरी झाला होता. त्याला सलीम जहांगीर नावाने सुद्धा ओळखले जाते. हिंदूस्तानावर जहांगीरने 3 नोव्हेंबर ते 28 ऑक्टोंबर 1627 दरम्यान शासन केले. याच दरम्यान काही निकाह सुद्धा केले. त्यामधील काही राजकीय करारासाठी होते. तर काही प्रेमसंबंधांच्या कारणास्तव करण्यात आले होते.

बादशाह शाहजहां
मुघल बादशाह शाहजहांच्या शासन काळाला भारताच्या इतिहासाला गोल्डन पीरियड असे म्हटले जाते. असे सुद्धा म्हटले जाते की, शाहजहाच्या शासन काळात प्रजा फार आनंदित असायची. मात्र शाहजहांच्या बेगम बद्दल जेव्हा बोलले जाते तेव्हा सर्वात प्रथम नाव येते ते म्हणजे मुमताज. कारण शाहजहा आणि मुमताज यांच्या मधील प्रेम संबंध प्रत्येकालाच माहिती आहेत. परंतु शाहजहांच्या बेगम मुमताज महलाव्यतिरिक्त आणखी काही बेगम होत्या. ज्यांची एकूण संख्या सात होती.


हेही वाचा- ‘या’ गावात पुरुषांना आहे no entry

- Advertisment -

Manini