Thursday, September 21, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Diary Neena Gupta...वयाच्या 42 व्या वर्षी पडल्या होत्या प्रेमात

Neena Gupta…वयाच्या 42 व्या वर्षी पडल्या होत्या प्रेमात

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता हिने आयुष्यात खुप चढउतार पाहिलेच. पण फार कमी लोकांना माहितेय ती कमी वयातच आई बनली होती. लग्नाशिवाय आई बनल्याने तिला खुप काही सहन करावे लागले होते. अशातच आता ती काही महिलांसाठी प्रेरणास्थान बनली आहे. आज आपण तिच्याबद्दलच काही खास गोष्टी पाहणार आहोत. (Neena Gupta love story)

वयाच्या 49 वर्षी प्रेम
नीनाच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा अडथळे आले तेव्हा तिने त्यापासून पळ कधीच काढला नाही, उलट त्याला खंबीरपणे सामोरे गेली. असे असताना ही अभिनेत्रीला आपलं खरं प्रेम हे वयाच्या 42 व्या वर्षात मिळाले. अशातच ज्या महिला वय पाहून लग्नगाठ बांधत नाही त्यांनी तिच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. अभिनेत्री असे म्हणते की, प्रेमाला वय नसते.

- Advertisement -

विवेक मेहरा सोबत लग्न
अभिनेत्री नीना गुप्ताने वयाच्या 49 व्या वर्षी विवेक मेहरा सोबत लग्न केले. याबद्दल अभिनेत्रीने स्वत: एका मुलाखतीत म्हटले होते की, तिची आणि विवेक मेहरा यांची पहिलीभेट 2002 मध्ये फ्लाइटमध्ये झाली होती. विवेक मेहरा हे दिल्लीतील चार्टर्ड अकाउंटेटची नोकरी करायचे. दोघांमध्ये काही काळानंतर उत्तम मैत्री झाली. या दोघांनी एकमेकांना 6 वर्ष डेट केले होते. तर रिपोर्ट्सनुसार तिने विवेक मेहरा सोबत 2008 मध्ये दुसरे लग्न केले.(Neena Gupta love story)

नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड लव्ह स्टोरी

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

- Advertisement -


नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड यांचे नाते 1980 च्या दशकाअखेरीस सुरु झाले होते. त्यावेळी विवियन विवाहित होते. आणि त्यांना दोन मुलं सुद्धा होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीना हिची विवियन सोबत पहिल्यांदा भेट एका पार्टीत झाली होती. पण या दोघांचे नाते फार काळ टिकले नाही.


हेही वाचा- Love Story : माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांची अधुरी प्रेम कहानी

- Advertisment -

Manini