अंबानी परिवाराच्या प्रत्येक गोष्टीवरुन चर्चा केली जाते. जेव्हा नीता अंबानींबद्दल बोलले जाते तेव्हा त्यांच्या पालकत्वाचे प्रत्येकजण कौतुक करतो. नीता अंबानी देशातील सर्वाधिक श्रीमंत परिवारातील असल्या तरीही त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना डाउन टू अर्थ राहण्यास शिकवले आहे. अशातच नीता अंबानींनी आपल्या परिवारातील मंडळींसाठी काय शिस्तीचे नियम ठेवले होते हे आपण जाणून घेऊयात.
ईशा अंबानीने एकदा म्हटले होते की, तिची आई म्हणजेच नीता अंबानी खुप स्ट्रिक्ट होत्या. तिला नेहमीच वाटायचे आम्ही वेळेवर जेवावे आणि तिच्यासोबत खेळावे. जर तिला शाळेत जायचे नसायचे तेव्हा आई असे करायला द्यायची नाही. मुलांसोबत स्ट्रिक्ट राहून तुम्ही त्यांना हे समजवू शकता की वेळ किती महत्त्वाचा आहे.
त्याचसोबत नीता अंबानी यांच्यावर घराचीच नव्हे तर संपूर्ण परिवाराची जबाबदारी होती. याच कारणास्तव त्यांना मुलांसाठी फार कमी वेळ द्यावा लागायचा. परंतु आईपणाची जबाबदारी त्यांनी पुर्णपणे पार पाडली. ईशाने असे सुद्धा म्हटले होते की, जेव्हा मुलांना गरज असायची तेव्हा ती आमच्यासोबत असायची. तिने करियर आणि फॅमिलीमध्ये खुप समतोल राखला होता.
तसेच श्रीमंत परिवारातील असली तरीही तिला पैशांची जाण होती. नीता आपल्या मुलांना पॉकेटमनी द्यायच्या. पण मुलांना त्याच पैशांमध्ये खर्च करायला ही सांगायच्या. त्यामुळे नीता अंबानी यांच्या मुलांना सुद्धा पैशांची कद्र होती. या व्यतिरिक्त नीता अंबानी आपल्या मुलांवर लक्ष ठेवून असायच्या. मुलं कुठे जात आहेत, काय करत आहेत. मुलांवर लक्ष ठेवणे नकारात्मक गोष्ट नाही. पण पालकांना त्यांच्याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे असते.
हेही वाचा- कोण आहे ही 11 वर्षीय करोडपती पिक्सी कर्टिस