Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Diary Rupali Chakankar : राजकारणापासून ते महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास

Rupali Chakankar : राजकारणापासून ते महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास

Subscribe

गेल्या दीड ते दोन वर्षाच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आक्रमक महिला नेत्या म्हटले तर आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर एक चेहरासमोर येतो. तो म्हणजे रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचा. मग, राष्ट्रवादी काँग्रेससाठी (NCP) रस्त्यावर उतरुन आंदोलन करणे असो, मोठ्या व्यासपीठावर भाषणाने उपस्थितांवर आपली छाप सोडणे असो, यात रुपाली चाकणकर यांनी आपले वेगळे नाव आणि ओळख बनविली आहे. सध्या रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी विराजमान आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पद देखील त्यांनी भूषविले आहे. आज आपण त्यांच्या राजकीय प्रवास उलघडणार आहोत.

रुपाली चाकणकर यांचा जन्म हे दौंडमधील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे. रुपाली चाकणकरांचे शालेलय शिक्ष हे रतत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात झाले असून यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासही केला आहे. रुपाली चाकणकर यांचे लग्न हे राजकीय कुटुंबात झाले आहे. रुपाली चाकणकरांनी सासरचा राजकीय वारसा पुढे नेला असून त्यांनी नगरसेविका ते महिला प्रदेशाध्यक्ष असा राजकीय प्रवास केला आहे. महिला प्रदेशाध्यक्ष पदी असताना रुपाली चाकणकरांनी महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि राष्ट्रवादीच्या महिला संघटना मजबूतद करण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. यानंतर रुपाली चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी त्यांची वर्णी लागली आहे. सध्या महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून काम करत आहेत.

- Advertisement -

असा सुरू झाला राजकीय प्रवास

रुपाली चाकणकर यांच्या सासूबाई रुक्मिणी चाकणकर 2002 ते 2007 या कालावधीत नगरसेविका म्हणून काम केले होते. सासूबाईच्या कामात हातभार म्हणून रुपाली चाकणकर यांनी बचत गटाच्या कामाला सुरुवात केली. रुपाली चाकणकरांनी मोठ्या प्रमाणात बचतगट स्थापन करत त्यातून त्यांचा राजकीय प्रवास सुरू केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी खडकवासला विधानसभा अध्यक्षपद रुपाली चाकणकर यांना दिले. 2008 साली खऱ्या अर्थाने रुपाली चाकणकर यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. रुपाली चाकणकर या खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या तालुका अध्यक्षपद भूषविले. यानंतर पुणे शहराध्यक्ष पद आणि प्रदेशाध्यक्ष पद असा राजकीय प्रवासानंतर आता महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून राज्यातील महिलांसाठी काम करत आहेत.

आंदोलनमधील चांगली आठवण

- Advertisement -

रुपाली चाकणकर या पुणे शहराध्यपदी स्थान मिळाल्यानंतर काही काळ सत्ताधारी पक्षाची शहराध्यक्ष म्हणून काम पाहले. यानंतर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर विरोधी पक्षातील शहाराध्यक्ष म्हणून देखील त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती. तेव्हा दोन्ही कालावधीमध्ये कामाचा त्यांना खूप चांगला अनुभव मिळल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगतिले. पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करताना असताना. आंदोलन केल्यामुळे अनेक गुन्हे देखील दाखल झाले आहेत. आजही रुपाली चाकणकरांवर 12 गुन्हे दाखल आहेत. त्यातील खासदार गिरीश बापट यांच्या घरासमोर महागाईविरोधात आंदोलन केले. दुसरे आंदोलन हे तानाजी सावंत यांनी खेकड्यांनी धरण फोडले या वक्तव्यावर आंदोलन केले. त्यावेळी तानाजी सावंत यांच्या घरी जाऊन खेकडे सोडले होते. याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पुण्याला आरोग्यप्रमुख नाही म्हणून आम्ही तिरडी बनवून त्यावर एका माणसाला झोपवून, त्याला सलाईन चालू करुन महापालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले होते. तसेच आम्ही जे आंदोलन केली त्या सर्व आंदोलनाला चांगले यश मिळाले आणि ज्यासाठी आंदोलन केली ते सर्व प्रश्न मार्गी लागले.

पुणे शहराध्यक्ष ते प्रेशाध्यक्ष असे झाले शक्य 

खडकवासला मतदारसंघातून 2019 साली विधानसभा निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त करत रुपाली चाकणकरांनी अर्ज देखील दाखल केला होता. त्यावेळी रुपाली चाकणकर यांची मुलाखत होणार होती. त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या पक्ष सोडून गेल्या होत्या. यानंतर अवघ्या 24 तास उलटण्याच्या पूर्वीच रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी निवड केली. यानंतर रुपाली चाकणकरांनी राज्यातील संघटनाबांधणीसाठी दौरे केले.


हेही वाचा – 300 राण्यांचा पती असलेला आळशी राजा

- Advertisment -

Manini