Friday, September 29, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Diary देशातील पहिली Transgender सब इन्स्पेक्टर पृथ्वीका यशिनी

देशातील पहिली Transgender सब इन्स्पेक्टर पृथ्वीका यशिनी

Subscribe

आजही आपल्या समाजात ट्रान्सजेंडर (Transgender) लोकांना परंपर आणि रुढीवादी विचारसरणीचा सामना करावा लागतो. अनेकदा तुम्ही पाहिले असेल की, ट्रान्सजेंडर्समध्ये भेदभाव केला जातो. ट्रान्सजेंडरला कोणी कामावर घेत नाही आणि कोणीही त्यांना मदत करू इच्छित नाही. आज आम्ही तुम्हाला देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर सब-इन्स्पेक्टर (Sub-Inspector) पृथ्वीका यशिनी (Prithika Yashini) बद्दल सांगत आहोत.

कोण आहे पृथ्वीका यशिनी

पृथ्वीकाचा जन्म सेलम जिल्ह्यात झाला. पृथ्वीकाच्या कुटुंबीयांनी तिचे नाव प्रदीप कुमार ठेवले होते. लिंग बदलानंतर तिने तिचे नाव बदलून पृथ्वीका यशिनी असे ठेवले आहे. पृथिकाने मुलाखतीत सांगितले की, ‘मी खूप गोंधळलेली होते आणि अभ्यासावर लक्षही देऊ शकत नव्हते. मी काय आहे हे आई-वडिलांना सांगायलाही मला भिती वाटत होती. लोक माझी चेष्टा करायचे,  एवढेच नाही तर समाजात आई-वडिलांची बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी घरही सोडले. पण, त्रासाची मालिका आता सुरू होणार होती, ज्याची पृथ्वीकाल कल्पना देखील नव्हती. अनेक जमीनदारांनी पृथ्वीकाला त्यांची घरे भाड्याने देण्यास नकार दिला. त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘मला तो दिवस आठवतो जेव्हा मला संपूर्ण रात्र कोयंबेडू बस स्थानकावर काढावी लागली.’ अशा परिस्थितीतही त्यांनी धैर्याने काम केले होते.

- Advertisement -

पोलीस अधिकारी होण्यासाठी केला अर्ज

पृथ्वीकाने पोलीस अधिकारी होण्यासाठी अर्ज केला. तेव्हा अर्जामध्ये लिंगचा कॉलम होता, त्यात स्री आणि पुरुष असे दोन पर्याय होते. पृथिकाने त्यांचे नाव आणि महिलेचा पर्याय निवडल्यानंतर ही त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला, कारण, तिचे नाव आणि महिला पर्याय सारखाच नव्हता. पण, तरीही तिने हार मानली नाही आणि त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठी लढाई लढली. न्यायालयाचा निकाल पृथ्वीकाच्या बाजून आला. न्यायालयाने 2017 मध्ये पृथ्वीकाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. पृथ्वीकाने तिच्या आयुष्यात कधीही हार मानली नाही आणि तिच्या नियुक्तीसाठी कायदेशीर लढा दिला.


- Advertisement -

हेही वाचा – सुधा वर्गीस यांना जीवे मारण्याची धमकी; ‘या’ समाजासाठी केलेल्या कामाबद्दल पद्मश्रीने गौरव

- Advertisment -

Manini